बहुसंख्या धनगर समाज बांधवांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश.
भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे व तालुका अध्यक्ष गंगाराम उर्फ बाबू आडूळकर, भाजपचे माजी सरपंच मंगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन सर्वांनी हाती घेतले कमळ.
वैभववाडी | ब्यूरो न्यूज : खांबाळे गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
उबाठाचे बाबाजी देसाई, बाबू आडूळकर, प्रकाश शेळके, प्रकाश आडूळकर, रमेश बर्गे, संजय गुरखे, संजय बर्गे, शिवाजी बर्गे, बाळकृष्ण बर्गे, संतोष शेळके, रामचंद्र शेळके, मुकेश बोडके, नाना शेळके, इंदुताई बर्गे, वनिता ताई बर्गे, संजना ताई बर्गे, सविता ताई बर्गे, संगीता शेळके, महेंद्र बोडेकर, नारायण बोडेकर, बाळू शेळके, प्रकाश व्हनु शेळके, शंकर शेळके, यांच्यासहित खांबाळे दारये, गेळये हेदीचा टेंब या तिन्ही धनगर वस्तीतील समस्त धनगर समाज बंधू भगिनींनी भाजपामध्ये आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, तालुका सरचिटणीस संजय सावंत, भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, भाजपा भटके विमुक्त आघाडी वैभववाडी तालुका अध्यक्ष गंगाराम उर्फ बाबू आडूळकर, तालुका सल्लागार दाजी बर्गे, तालुका चिटणीस चंद्रकांत बोडेकर, भाजपा भटके विमुक्त आघाडी युवा अध्यक्ष अनिल कोकरे, भाजपा माजी सरपंच मंगेश कदम, बूथ अध्यक्ष महेश चव्हाण व श्रीकृष्ण पवार, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमोल चव्हाण , भाजप पदाधिकारी उमेश पवार, ज्ञानेश्वर पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य लहू पवार, जयसिंग पवार व इतर भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेले कित्येक वर्ष शिवसेना उबाठा गटाकडे असणारी खांबाळे ग्रामपंचायत धनगर वस्ती ना न्याय देऊ शकली नाही प्रामुख्याने रस्ता पाणी या सुविधा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिवसेना उबाठागटाच्या पदाधिकाऱ्यांनी कोणती सुविधा या धनगर वस्ती वरती पोहोचवली नाही.आपल्याला त्यांनी न्याय दिला नाही त्यामुळे या सर्वांनी शिवसेना उबाठा गट सोडण्याचा निर्धार जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, तालुका अध्यक्ष गंगाराम उर्फ बाबू अडूळकर, माजी सरपंच मंगेश कदम, उमेश पवार, महेश चव्हाण, श्रीकृष्ण पवार व इतर पदाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये केला. व आमच्या समस्या भारतीय जनता पार्टी सोडवणार असतील तर तुमच्या सर्वांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमदार नितेश राणे साहेब यांचं चालू असलेलं कार्याला प्रेरित होऊन सर्व समाज बांधवांनी भारतीय जनता पार्टी महायुती सोबत जाण्याचा निर्णय एकमताने घेतला व हे संपूर्ण धनगर समाज आपल्या सर्वांगीण विकासासाठी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात दाखल झाले. या धनगर वस्तीच्या प्रवेशाने तालुक्यातील संपूर्ण धनगर समाज भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली एकत्र आला आहे. येणाऱ्या काळात आमदार नितेश राणे भाजपा महायुती व सर्व पदाधिकारी आम्हाला न्याय देतील असा विश्वास याठिकाणी उपस्थित समाज बांधवांनी भगिनींनी व्यक्त केला आहे. तसेच प्रवेश कर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी भाजपामध्ये स्वागत करून तुमच्या प्रलंबित विषयावरती आम्ही तोडगा काढू आणि लवकरात लवकर तुम्हाला विकसित करण्याकरिता प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले. या प्रवेशाने शिवसेना उबाठा गटाच्या बालेकिल्ल्याला मोठा धक्का बसला आहे. तर भाजपाची या ठिकाणी मजबुतीकरण होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून या गावात विकास गंगा येईल असा विश्वास व शब्द उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी धनगर गावाला दिला आहे.