मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील बुथ क्र. १०० येथे मविआ उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ १६ नोव्हेंबर रोजी श्री संजय बिडये यांच्या घराजवळून करण्यातआला. यावेळी मविआ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मविआ पदाधिकार्यानी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी नगरसेवक नितीन वाळके म्हणाले की, ही निवडणूक निर्णायक आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कोरोना काळात सक्तीची टाळेबंदी असताना आमदार वैभव नाईक यांनी रस्त्यावर उतरुन काम केले परंतु तेंव्हा प्रतिस्पर्धी उमेदवार जनतेला दिसत नव्हता.
यावेळी नगरसेवक यतीन खोत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व कार्यसम्राट, एकनिष्ठ, कार्यतत्पर व कार्यदक्ष जायंट किलर आमदार वैभव नाईक यांनी ५० खोक्यांची ऑफर असून ते आपल्या मताशी एकनिष्ठ राहीले आणि आता आपण त्यांना मताधिक्य देणे ही काळाची गरज आहे. कोव्हिड व तौक्ते काळात विरोधक आपल्या बंगल्यात सेफ होते व वैभव नाईक टूव्हीलरने लोकांना मदत करत होते. दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नियोजन व आमदार वैभव नाईक यांच्या तत्परतेमुळे महाराष्ट्रातील वीजमंडळाचे कर्मचारी तौक्ते वादळानंतर दुसर्या दिवशी मालवणात पोचले होते अन्यथा महिनाभर तरी मालवणात वीज पुरवठा शक्य झाला नसता अशी परिस्थिती झाली होती.
यावेळी माजी नगरसेवक यतीन खोत, माजी नगरसेवक नितीन वाळके, पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, उमेश मांजरेकर, रवी तळाशीलकर, राजा शंकरदास, वासुदेव गांवकर, महेश मयेकर, काशीनाथ मांजरेकर, संदेश कोयंडे, श्री मालंडकर, अरविंद जाधव, अमन बेग, आशीष शेडगे, मनोज शिरोडकर, प्रमोद वायंगणकर, निखील शिंदे, रुपेश कांबळी, अमित मालवणकर, आबा मसुरकर, आनंद धुरी, गुणवंत मडये, श्री. कीर, दादा पाटकर, अनिकेत आचरेकर, संजय बिडये, संदीप गांवकर, हर्षल मयेकर, माजी पंचायत समिती सभापती पूनम खोत, शिल्पा खोत, दीपा शिंदे, नंदा सारंग, निनाक्षी मेथर, प्रतिभा चव्हाण, रुपा कांदळकर, स्वाती तांडेल, रूपा कांदळकर, मनीषा पारकर, गौरी कुमामेकर, सदफ खटखटे, अश्विनी आचरेकर, प्रमिला मयेकर, साक्षी मयेकर, शांती तोंडवळकर, निकिता कोरगावकर, हर्षदा मयेकर, संजीवनी बिडये, मानसी घाडीगावकर, सौ वस्त, संजना आचरेकर उपस्थित होते.