श्रीकांत सावंत यांचे समस्त कोकणवासियांना आवाहन.
प्रतिनिधी : रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे समस्त कोकणवासियांना आवाहन केले आहे. सावंत यांनी म्हणले आहे की, मुंबई व कोकणातील मूलभूत प्रश्न, अत्यावश्यक प्रश्न व सोयीसुविधा याबाबत आपापल्या लोकप्रतिनिधी उमेदवारांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या सर्वोच्च नेतृत्वांना ‘आत्ताच’ ठामपणे प्रश्न विचारायची धमक ठेवून ती मिळवण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. असे एकत्रितपणे झाले तर मुंबई व कोकणातील सर्वांगीण विकासाची तत्पर, नियमित व ठोस कार्यवाही सुरु होईल. कोकणरेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनिकरण तसेच कोकणातिल बंद झालेली बोट वाहतुकीच्या मुद्द्यांबाबतही ठामपणे विचारणा झालीच पाहिजे असे आवाहन श्रीकांत सावंत यांनी केले आहे.
पर्यटनाच्या भरभराटीसाठी सक्षम विमानतळे , सावंतवाडी टर्मीनस, बंदरे विकास याबाबत ठामपणे विचारलं गेलं तरच कोकण व मुंबईच्या जनतेच्या मताचं खर्या अर्थाने सोने होईल. प्रश्नांची सकारात्मक उत्तरे मिळायचा कालावधी जितका कमी होत जाईल तितकी विकाकामांकडे हमखास लक्ष वेधले जाईल असा विश्वास श्रीकांत सावंत यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे व्यक्त केला आहे.