२ डिसेंबरला होणार स्पर्धा ; चिंदर गावातील ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन.
आचरा | प्रतिनिधी : श्री देवी सरस्वती वाचनालय आणि ग्रंथसंग्रहालय चिंदर या संस्थेमार्फत सोमवार दि. २ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक ११ : ०० वाजता. केंद्र शाळा चिंदर नं १ येथे चिंदर गाव मर्यादित अंगणवाडी ते चौथी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा’ आयोजित केली आहे. सदर स्पर्धा खालील तीन गटात घेतली जाणार आहे.
या स्पर्धेचे गट खालीलप्रमाणे आहेत.
क्र.१ : अंगणवाडी /बालवाडी-पहिले ५ श्लोक, गट क्र.२- १ ली ते २ री ६ ते १५ श्लोक, गट क्र.३- ३री ते ४ थी १६ ते २५ श्लोक,
विजेत्यांना अंगणवाडी /बालवाडी- १०० रू च्या वर किमतीचे शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र, १ ली ते २ री- प्रथम क्रमांक ३००, द्वितीय क्रमांक २००, तृतीय क्रमांक १०० रुपये किंमतीचे शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र, ३ री ते ४ थी – प्रथम क्रमांक ५००, द्वितीय क्रमांक ३००, तृतीय क्रमांक- २०० रुपये किमंतीचे शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र बक्षिसे देण्यात येणार आहेत.
प्रत्येक शाळेतून प्रत्येक गटातून दोन विद्यार्थी पाठवावे, सर्व शाळांनी स्पर्धकांची यादी दि.२७/११/२०२४ पर्यंत १) सौ. स्वरा शिशिर पालकर – ग्रंथपाल – ९४०४१९७४०, २) केंद्रप्रमुख – केंद्रशाळा चिंदर नं. १, प्रसाद चिंदरकर, ९४२३८०५८९४, ३) सौ. मनवा चिंदरकर – ७५८८९६३२३१, ४) भूषण दत्तदास – ९४२०७१५४६१ यांच्याकडे नोंदवावी आणि जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन संस्थेच्या कार्यकारिणी, सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.