प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार श्री. राजू पाटील यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र तथा ज्येष्ठ साहित्यिक गिरीधर पुजारे पलावा सिटी डोंबिवली येथे सत्कार संपन्न झाला. आमदार राजू पाटील यांनी साहित्यिक गिरीधर पुजारे यांच्या काव्य लेखन शैलीची विशेष प्रशंसा केली.


यावेळी आमदार राजू पाटील, कासाबेला गोल्ड सिटी प्रेसिडेंट योगेश पाटील व पलावा सिटी येथील ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते. यावेळी श्री. गिरीधर पुजारे यांनी आमदार राजू पाटील यांच्यावर रचलेले स्वरचित काव्याची फोटो फ्रेम भेट दिली व त्यांचावरील काव्याचे जाहीर वाचन देखिल केले.