27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

खासदार नारायण राणे यांच्या हस्ते महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते ५ नोव्हेंबर रोजी मालवण मधील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन संपन्न झाले. मालवण शहरातील मेढा, दैवज्ञ भवन नजीक येथे माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते फित कापून हे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महायुतीचे शिवसेना उमेदवार निलेश राणे राणे यांनी श्रीफळ फोडून श्रीगणेशा केला. यावेळी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आर पी आय (आठवले गट) महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी खासदार नारायण राणे म्हणाले या प्रचार कार्यालयाची विजयाची ख्याती आहे. या निवडणुकीतही ते दिसून येईल. प्रत्येक बूथवर मोठी आघाडी असेल. महायुतीचे उमेदवार निलेश राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला. इथले आमदार दहा वर्षात निष्क्रिय ठरला असे प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी केले.

यावेळी निलेश राणे म्हणाले महायुती जोमाने काम करत आहे. ही ताकद मोठा विजय निश्चित करणारी आहे. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मार्गदर्शन केले. मोठया विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, श्वेता कोरगावकर, रणजित देसाई, शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गांवकर, किसन मांजरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवासेना पदाधिकारी प्रितम गावडे, महिला उपजिल्हाप्रमुख निलम शिंदे, भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, राजा गांवकर, आबा हडकर, अभय कदम, शिवसेना शहरप्रमुख बाळू नाटेकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत, राकेश सावंत, अमित गावडे, महेश गांवकर, नितेश पेडणेकर, यांच्यासह महायुती पदाधिकारी, कार्यकर्ते उपास्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!