25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

सरकार महायुतीचेच येणार व कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे असणार.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण भाजपा तालुका कार्यकर्ता मेळाव्यात खासदार नारायण राणे यांचा विश्वास.

मालवण | प्रतिनिधी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
नेतृत्वात देश प्रगतीपथावर असून दरडोई उत्पन्नासह अर्थ व्यवस्थेत देश ५ व्या क्रमांकवर आपला देश आहे. महाराष्ट्र राज्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुतीचे लोकप्रिय सरकार लोककल्याणकारी राज्य बनवण्यासाठी कार्यरत आहे. जनतेच्या पाठिंब्यावर महायुतीचे सरकार १६० पेक्षा जास्त जागी विजयी होत पुन्हा येणार हे निश्चित आहे. यात मालवण कुडाळ मतदारसंघातून जनतेच्या सेवेत सातत्याने असणारे महायुतीचे उमेदवार निलेश राणे ५० हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होतील. असा ठाम विश्वास भाजपा नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे भाजपा मालवण तालुका कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केला. त्यांनी विरोधकांवर तोफ डागली आणि विचारले की विरोधकांनी काय केले व त्यांचे विकासात योगदान काय? केवळ टीका करणे हेच यांचे काम आहे. मात्र आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न ३५००० वरुन हजारा मधून २ लाख पेक्षा पुढे गेले. याहीपेक्षा जिल्ह्याची, जनतेची प्रगती मला करायची आहे. माझ्या कोकणी जनतेचे ऋण फेडायचे आहेत. नितेश, निलेश जनतेत राहून करत असलेले काम वडिल म्हणून मला अभिमान वाटावे असेच आहे महायुती म्हणून एकसंघ काम सुरु आहे. आजचा भाजपा मेळावाही निलेश राणे यांचा विजय निश्चित करणारा उत्स्फूर्त आहे असेही खासदार नारायण राणे यांनी सांगितले. आमचे सरकार जनतेत राहून काम करते. आधीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन वर्षात फक्त दोन तास मंत्रालयात आले. येथील आमदारही दहा वर्षात पूर्ण अपयशी ठरले. बस स्टॅन्डवर शौचालय नाही. ही येथील परिस्थिती आहे. आता जनतेने निर्धार केला आहे. पुन्हा महायुती सरकार येणार आणि आमदार निलेश राणे असणार असाही विश्वास खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.

मालवण तालुका भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा मंगळवारी जानकी मंगल कार्यालय कुंभारमाठ येथे भाजपा जेष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे, महायुतीचे उमेदवार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

मेळाव्यात आरंभी खासदार नारायण राणे व निलेश राणे यांचे तालुकाध्यक्ष धोंडी चिदरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.

माजी आमदार प्रमोद जठार यांचे बाबा मोंडकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे सुदेश आचरेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महिला जिल्हा अध्यक्ष श्वेता सावंत यांचे अन्वेषा आचरेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विधानसभा निरीक्षक जयंत जाधव यांचा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांचे हस्ते स्वागत करण्यात आले.

यावेळी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की खासदार नारायण राणे यांच्या प्रेरणेने आपण सर्वजण काम करतो. या मतदार संघात निधी आणणारा व विधानसभेत आक्रमकपणे काम करणारा आमदार गरजेचा आहे आणि तेच आपण करणार आहोत.

मेळाव्यात विधानसभा निरीक्षक जयंत जाधव, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, जेष्ठ पदाधिकारी विलास हडकर, उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, विधानसभा समन्वयक बाबा परब, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, महेश मांजरेकर, आप्पा लुडबे, संतोष गांवकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, राजन वराडकर, पंकज सादये, अजिंक्य पाताडे, दाजी सावजी, मंगेश गांवकर, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगांवकर, सरोज परब, रश्मी लुडबे, मसुरकर, अन्वेषा आचरेकर, पूजा करलकर, कुंभारमाठ सरपंच पूनम वाटेगावकर, पूजा सरकारे, राकेश सावंत, ललित चव्हाण, निशय पालेकर, राज कांदळकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात विलास हडकर, जयंत जाधव, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी उपस्थितांना संबोधीत केले.

खासदार नारायण राणे व निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीने एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!