24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

सिंधु बँक ग्रुप पर्सनल एक्सीडेंट विमा पॉलीसीचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शुभारंभ

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | उमेश परब : जिल्हा बँक ग्राहकांना विविध प्रकारच्या वाहन खरेदी करीता तसेच शेतकऱ्यांना पॉवर टिलर, ट्रॅक्टर इत्यादी शेतीपयोगी अवजारे तथा यंत्रसामुग्री खरेदीसाठी जिल्हा बँकेकडून मोठया प्रमाणावर कर्ज पुरवठा करण्यात येतो. दुर्दैवाने यातील काहींना वाहनाच्या एक्सीडेंट मध्ये किंवा अन्य अपघातामुळे मृत्युला सामोरे जावे लागते. सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये ग्राहकांच्या सुरक्षेमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत रू.१२/- मात्र वार्षिक हप्ता भरून बँकेकडून खातेदारांना रू.२.०० लाखापर्यंत अपघाती विमा लाभ देण्यात येत आहे. आतापर्यंत बँकेमार्फत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत ५२,६०१ लोकांचा अपघात विमा उतरविलेला असून सन २०१९-२० व सन २०२०-२१ मध्ये यापैकी ज्या विमा धारकांचा अपघाती मृत्यू झाला आहे त्यांच्या वारसास प्रत्येकी रू.२.०० लाख याप्रमाणे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळालेला आहे.बँकेच्या खातेदारांना जादा विमा संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने बँकेच्या संचालक मंडळाने दि.न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीसोबत चर्चा करून बँकेमार्फत एटीएम/किसान क्रेडीट कार्ड धारकांसाठी वाढीव रू.२.०० लाख विमा संरक्षण असलेली “सिंधु बँक ग्रुप पर्सनल एक्सीडंट’ पॉलिसी दि.०१ डिसेंबर २०२१ पासून राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेबरोबरच बँकेच्या कर्जदार ग्राहकाचे बाबतीत अशी दुर्दैवी घटना घडल्यास (प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना रू.२.०० लाख व ग्रुप पर्सनल एक्सिडंट विमा पॉलीसी रू.२.०० लाख) पात्र कर्जदाराच्या बाबतीत त्याच्या कर्जाचा रू.४.०० लाखपर्यंत कुटुंबावरील कर्जाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा बँकेच्या एटीएम/किसान क्रेडीट कार्डधारक असणाऱ्या सुमारे ६५,००० ग्राहकांसाठी ही सुविधा बँक उपलब्ध करून देणार असून पुढील टप्प्यात बँकेच्या खातेदारांची संमत्ती घेवून उर्वरित खातेदारांसाठी सदरची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सदर योजनेचा शुभारंभ खासदार मा.सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते दि.१७/११/२०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता जिल्हा बँकेच्या सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील प्रधान कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे. तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी जिल्हा बँकेचे खातेदार होवून सदर सुविधा मिळण्यासाठी संमत्ती दयावी व अपघात विमा संरक्षण घेण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष मा.सतिश सावंत यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | उमेश परब : जिल्हा बँक ग्राहकांना विविध प्रकारच्या वाहन खरेदी करीता तसेच शेतकऱ्यांना पॉवर टिलर, ट्रॅक्टर इत्यादी शेतीपयोगी अवजारे तथा यंत्रसामुग्री खरेदीसाठी जिल्हा बँकेकडून मोठया प्रमाणावर कर्ज पुरवठा करण्यात येतो. दुर्दैवाने यातील काहींना वाहनाच्या एक्सीडेंट मध्ये किंवा अन्य अपघातामुळे मृत्युला सामोरे जावे लागते. सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये ग्राहकांच्या सुरक्षेमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत रू.१२/- मात्र वार्षिक हप्ता भरून बँकेकडून खातेदारांना रू.२.०० लाखापर्यंत अपघाती विमा लाभ देण्यात येत आहे. आतापर्यंत बँकेमार्फत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत ५२,६०१ लोकांचा अपघात विमा उतरविलेला असून सन २०१९-२० व सन २०२०-२१ मध्ये यापैकी ज्या विमा धारकांचा अपघाती मृत्यू झाला आहे त्यांच्या वारसास प्रत्येकी रू.२.०० लाख याप्रमाणे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळालेला आहे.बँकेच्या खातेदारांना जादा विमा संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने बँकेच्या संचालक मंडळाने दि.न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीसोबत चर्चा करून बँकेमार्फत एटीएम/किसान क्रेडीट कार्ड धारकांसाठी वाढीव रू.२.०० लाख विमा संरक्षण असलेली "सिंधु बँक ग्रुप पर्सनल एक्सीडंट' पॉलिसी दि.०१ डिसेंबर २०२१ पासून राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेबरोबरच बँकेच्या कर्जदार ग्राहकाचे बाबतीत अशी दुर्दैवी घटना घडल्यास (प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना रू.२.०० लाख व ग्रुप पर्सनल एक्सिडंट विमा पॉलीसी रू.२.०० लाख) पात्र कर्जदाराच्या बाबतीत त्याच्या कर्जाचा रू.४.०० लाखपर्यंत कुटुंबावरील कर्जाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा बँकेच्या एटीएम/किसान क्रेडीट कार्डधारक असणाऱ्या सुमारे ६५,००० ग्राहकांसाठी ही सुविधा बँक उपलब्ध करून देणार असून पुढील टप्प्यात बँकेच्या खातेदारांची संमत्ती घेवून उर्वरित खातेदारांसाठी सदरची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सदर योजनेचा शुभारंभ खासदार मा.सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते दि.१७/११/२०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता जिल्हा बँकेच्या सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील प्रधान कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे. तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी जिल्हा बँकेचे खातेदार होवून सदर सुविधा मिळण्यासाठी संमत्ती दयावी व अपघात विमा संरक्षण घेण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष मा.सतिश सावंत यांनी केले आहे.

error: Content is protected !!