29.4 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

भूमीपुत्र आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी लढणारी रेल कामगार सेना यश मिळवेल

- Advertisement -
- Advertisement -

शिवसेना नेते संदेश पारकर यांनी व्यक्त केला विश्वास.          
कणकवली | उमेश परब :कोकण रेल्वेच्या संघटनेच्या मान्यता प्राप्ततेसाठी शिवसेना रेल कामगार सेना आणि कोकण रेल्वे एम्पॉइज युनियन यांच्या युतीच्या माध्यमातून शिवसेना उद्या होणाऱ्या रेल्वे कामगार युनियनच्या निवडणुकीत उतरत आहे. कोकणातील आणि सिंधुदुर्गातील सर्व शिवसैनिकांना तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून कोकण रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि भूमीपुत्रांच्या हक्कांसाठी रेल कामगार सेनेला विजयी करावं. आम्ही या निवडणूकीत १००% यश मिळवू हा आम्हाला विश्वास आहे, असे कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते संदेश पारकर यांनी आज कणकवली येथे पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितले आहे.
एम. आर. एम. यू. ची संघटना आणि त्याचे जनरल सेक्रेटरी वेणू नायर यांनी महाराष्ट्रात, कोकणात अगदी उच्छाद मांडला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्यांनी कॕलेंडरमध्ये एकेरी उल्लेख केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला त्यांनी चप्पलेचा हार घातलेला आहे. त्यामुळे या बेशिस्त वर्तन करणाऱ्या वेणू नायरला धडा शिकवण्यासाठी शिवसेना या निवडणूकीत उतरली आहे. तसेच या बेशिस्त वर्तनात सुधारणा झाली नाही, तर शिवसेना रेल कामगार सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यांचा तीव्र निषेध तमाम महाराष्ट्राच्या वतीने करण्यात येईल, असा इशारा संदेश पारकर यांनी दिला. रेल कामगार सेना ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या भूमीपुत्रांसाठी, ज्यांनी आपल्या जमिनी देऊन ही कोकण रेल्वे उभी केली, त्यांना या रेल्वेच्या सेवेमध्ये घेण्यात यावे, या मागणीसाठी आग्रही आहे. कोकणात गुणवत्ता ठासून भरलेली आहे. इथेही अनेक इंजिनियर आहेत. त्यांना या कोकण रेल्वेच्या सेवेमध्ये स्थान देण्यात यावं. तसंच जे प्रवासी कोकण रेल्वेमधून प्रवास करत आहेत, त्यांना सुरक्षितता मिळावी, चांगली सेवा मिळावी, ही सुद्धा रेल कामगार संघटनेची भूमिका आहे. अनेक प्लॕटफॉर्मवर अजूनही छप्पर नाही. प्रवाशांना भिजत उभं राहावं लागतंय. स्वच्छतेचा प्रश्नही मोठा आहे. त्यामुळे असे अनेक प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून रेल कामगार सेनेच्या माध्यमातून सोडविणार आहोत. या साठी रेल कामगार सेनेला अनेक संघटनांचा, असोसिएशनचा पाठिंबा मिळालेला आहे. कोकण रेल्वे एम्पॉइज युनियन, आॕल इंडिया एस. सी., एस. टी. युनियन, आॕल इंडिया ट्रॕकमन असो., आॕल इडिया पॉइंट्समन असो. अशा अनेक संघटनांचा पाठिंबा रेल कामगार सेनेसोबत आहे. नारळाच्या झाडाची निशाणी घेऊन सेना या निवडणूकीत उतरत आहे. त्यामुळे शिवसैनिकांना आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना अशी विनंती आहे, की त्यांनी या निशाणीवर मतदान करून कोकण रेल्वेच्या प्रलंबित असणाऱ्या विविध मागण्यांसाठी आणि कोकण रेल्वेच्या मान्यताप्राप्ततेसाठी लढवल्या जाणाऱ्या या निवडणूकीला सहकार्य करावं, असे आवाहन संदेश पारकर यांनी केले आहे.
रेल्वे प्रवाशांचे, रेल्वे कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेमार्फत आक्रमक भूमिका घेतली जाईल. कोकण रेल्वेच्या सी. एम. डी. यांनासुद्धा त्याबाबतची निवेदनं दिली जातील. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हे तत्व अंगीकारून चालणारी शिवसेना ही सुरुवातीपासून सर्वसमान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही आहे. रेल कामगार सेनेलाही मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळालेलं आहे. त्यामुळे या निवडणूकीत रेल कामगार सेना १०० टक्के यश प्राप्त करेल, अशा विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, ट्रॕकमन धोरण समिती अध्यक्ष स्वप्नील झेमशे, जनरल सेक्रेटरी राजू सुरती, सह सेक्रेटरी चंदन गुरव, सह कार्याध्यक्ष जी. के. दळवी, सी. डी. सोनसुरकर, संतोष कुंभार, नितीन नवाळे, उत्तम हरमलकर, संतोष घोडके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!