24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवणात शिवसेनेचा मेळावा उत्साहात ; निलेश राणे यांचा भव्य सत्कार.

- Advertisement -
- Advertisement -

शिवसेना उपनेते संजय आग्रे, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, कुडाळ मालवण विधानसभा समन्वयक महेश कांदळगांवर यांचा नियुक्तीपर सत्कार.

मालवण | प्रतिनिधी : आपल्या वडिलांची राजकीय कारकिर्द शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाने सुरु झाली आणि आपली राजकीय सेकंड इनिंग देखील शिवसेनेच्याच धनुष्यबाण चिन्हाने सुरु होत आहे हे भाग्याचे आहे, असे उद्गार शिवसेना महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी मालवण येथे आयोजीत शिवसेनेच्या भव्य मेळाव्यात काढले. शिवसेना प्रमुख दत्ता सामंत हे नेहमीच जनहीतासाठी कार्यरत असणारे कणखर व्यक्तीमत्व असून त्यांचे व कुटुंबियांशी नाते याबद्दल विरोधकांनी कितीही गैरसमज पसरवले तरीही आम्ही एकसंधपणे केवळ जनतेचाच विचार करतो व काम करतो असे प्रतिपादन निलेश राणे यांनी केले. पुढील दिवस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सरकारने आणलेल्या योजना व केलेली कामे तळागाळापर्यंत अथकपणे पोहोचवणे हे आपले काम आहे असे उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना मालवणच्या वतीने बबन शिंदे यांच्या हस्ते निलेश राणे यांचा भव्य सत्कार संपन्न झाला.

या कार्यक्रमात यानंतर शिवसेना उपनेते संजय आग्रे यांचा मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर यांनी सत्कार केला. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा मालवण तालुकाप्रमुख महेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा समन्वयक महेश कांदळगांवर यांचा मालवण शहरप्रमुख बाळू नाटेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजा गावडे यांचा आचरा विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की भविष्यकाळ शिंदे साहेबांची शिवसेना फोफावल्या शिवाय रहाणार नाही. इथे जर मेरीटवरी काम केले की पदे आपोआप मिळतील. खासदार नारायण राणे यांचे आम्ही शिष्य आहोत त्यामुळे त्यांची कार्यपद्धती ही मेरीटवरती कामे करण्याची आहे. या दरम्यान कोणी कार्यकर्ता हा जर रुसवा फुगवा करत असेल तर तो कार्यकर्ता नाही. महायुतीसोबत खांद्याला खांदा लावून काम केले जाईल असेही जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले.

यावेळी संजय आग्रे म्हणाले की दत्ता सामंत यांच्या जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्तीने शिवसेना अधिक बळकट झाली आहे आणि ते विधानपरीषदेचे आपले आमदार असतील. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा समन्वयक महेश कांदळगांवर यांनी सांगितले की निलेश राणे हे कामं करुन घ्यायची धमक असणारे नेतृत्व आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे एक वादळ असल्याचे महेश कांदळगांवर यांनी सांगत आता शेवटच्या षटकात अनेक चौकार षटकार बसणार त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या जिल्हा प्रमुख कार्यकालाची त्यांनी प्रशंसा केली. मालवण नगरपालिका नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो तेंव्हा शिवसेना हेच चिन्ह होते व शिवसेना भाजप हीच युती होती असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आनंद शिवलकर यांची शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदी, सुरेश चौकेकर यांची जिल्हा सरचिटणीस पदी व मंदार लुडबे यांची युवा जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.

निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जानकी मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या शिवसेनेच्या या भव्य मेळाव्यात उपनेते संजय आग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह विधानसभा प्रमुख बबन शिंदे, जिल्हा संघटक रुपेश पावसकर, विधानसभा समन्वयक महेश कांदळगांवर, उपजिल्हा प्रमुख विश्वास गांवकर, उपजिल्हा प्रमुख राजा गावडे, मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर व महेश राणे, योगेश तुळसकर, शिवसेना प्रवक्ते रत्नाकर जोशी, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख नीलम शिंदे, महिला आघाडी मालवण तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, महिला आघाडी मालवण तालुकाप्रमुख आशाताई वळप्पी, युवासेना जिल्हा प्रमुख ॠत्विक सामंत, युवासेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, युवासेना नवनियुक्त संपर्क प्रमुख मंदार लुडबे, युवासेना सोशल मिडिया जिल्हा प्रमुख हर्षद पाटकर, युवासेना विधानसभा प्रमुख प्रीतम गावडे, जेराॅन फर्नांडिस, पराग खोत, चंद्रकांत गोलतकर, सरपंच पूनम वाटेगांवकर, सरपंच स्नेहल बिरमोळे, सरपंच रवीना घाडीगांवकर, सुरेश चौकेकर, दिलीप बीरमोळे, प्रसाद गावडे, किशोर खानोलकर, छोटू ठाकुर, राजू बिडिये, राजू सावंत, मिहीर राणे, माजी सभापती सुनील घाडीगांवकर, महेश बागवे, मनोज हडकर, संतोष साटविलकर, संतोष कोदे, सुधीर साळसकर, किसन मांजरेकर, बाळा माने, मंगेश गांवकर, आणि शिवसेना मालवण पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. राजा सामंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिवसेना विधानसभा प्रमुख बबन शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!