सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली असून शिवसेना प्रमुख नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आग्रे यांना शिवसेना उपनेतेपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले व पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या. यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक, नूतन जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख बापू धुरी आदी उपस्थित होते.
आग्रे यांच्या पक्षसंघटनेसाठी केलेल्या याच कामाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव संजय मोरे यांनी संजय आग्रे यांची शिवसेना उपनेते पदी नियुक्ती करत असल्याचे नियुक्तीपत्र दिले आहे.