परप्रांतीय हायस्पीड एलईडी बोटींचे लोंढेच्या लोंढे अडवू शकत नसाल तर भरभसाठ भाडे भरुन घेतलेली बोटीचा उपयोग काय असा केला सवाल.
मालवण | प्रतिनिधी : मालवणचे मच्छिमार नेते पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांनी सध्या परप्रांतीय एलईडी बोटींचे लोंढे वाढत आहेत असे सांगून परप्रांतीय हाय स्पीड एलईडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात, महाराष्ट्र जलधी क्षेत्रात घुसत किनाऱ्यालगत शेकडोच्या संख्येने येऊन स्थानिक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमाऱ्यांना अरेरावी करत आहेत असा आरोप केला आहे. हे येणारे परप्रांतीय बोटींचे लोढे शासन रोखून जिल्ह्यातील मच्छीमाऱ्यांना न्याय देऊ शकत नसेल तर सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मच्छीमार गप्प बसणार नाही आणि सहनही करणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. जिल्ह्यातील मच्छिमार सगळं कायद्याप्रमाणे व रीतसर वागतो म्हणून त्याचा गैरफायदा घेतला जात आहे असे असेल आणि आता जर मत्स्य विभागाने कठोर पावलं उचलली नाहीत तर तर मच्छिमार स्वतःच धडक देणार असा इशारा बाबी जोगी यांनी दिला आहे. हे सगळंच सहनशक्तीच्या सर्व मर्यादा सोडायला लावणारे असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
येत्या दोन दिवसात हे सर्व लोढे न थांबल्यास मच्छीमाऱ्यांचा मच्छीमारांचा प्रमुख अन्न असलेला मासा न वाचवल्यास येत्या दोन दिवसात सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्य विभाग आयुक्तांना जाब विचारणार असून दिवसाला २५,००० भाड्याने घेऊन घेतलेली बोट शोभेसाठी आहे का अशी टीका मच्छिमार नेते पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांनी मत्स्य विभागावर केलीआहे.