29.3 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

लौकिक भोगले याला लोक वाद्य वादन स्पर्धेत कांस्य पदक.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे सुपुत्राची पुणे येथे पख़वाज, ढोलकी, संबळ, हलगी, दिमडी, धनगर ढोलसह १० हून अधिक तालवाद्ये वाजवायची कामगिरी.

मसुरे | प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कडून आयोजित केलेल्या जल्लोष या स्पर्धेत लोकवाद्यसाठी मसुरे गडघेरावाडी येथील सुपुत्र लौकिक भगवान भोगले याला कांस्यपदक मिळाले आहे. त्याची पुणे विद्यापिठाच्या लोकवाद्य गृप मध्ये निवड झाली आहे.त्याने पख़वाज, ढोलकी, संबळ, हलगी, दिमडी, धनगर ढोल इत्यादी १० हून अधिक तालवाद्ये वाजवली होती.

लौकिक भोगले हा पुणे विद्यापीठात पुढे होणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय लोक वाद्यवृंदासाठी कला सादर करणार आहे. लौकिक भोगले याचे पखवाज वादनाचे शिक्षण प्रसिद्ध पखवाज विशारद मसुरे गावचे सुपुत्र गुरुवर्य श्री सचिन कातवणकर सर यांच्या कडे चालू आहे. लौकिक भोगले सध्या विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनीरिंग चे शिक्षण घेत आहे.
लौकिक याच्या यशाबद्दल उद्योजक दीपक परब, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, छोटू ठाकूर, सरोज परब, महेश बागवे, विलास मेस्त्री, सौ शर्वरी सावंत, श्रीकांत सावंत यांनी अभिनंदन केले असून त्याचे मसुरे गावातून कौतुक होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे सुपुत्राची पुणे येथे पख़वाज, ढोलकी, संबळ, हलगी, दिमडी, धनगर ढोलसह १० हून अधिक तालवाद्ये वाजवायची कामगिरी.

मसुरे | प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कडून आयोजित केलेल्या जल्लोष या स्पर्धेत लोकवाद्यसाठी मसुरे गडघेरावाडी येथील सुपुत्र लौकिक भगवान भोगले याला कांस्यपदक मिळाले आहे. त्याची पुणे विद्यापिठाच्या लोकवाद्य गृप मध्ये निवड झाली आहे.त्याने पख़वाज, ढोलकी, संबळ, हलगी, दिमडी, धनगर ढोल इत्यादी १० हून अधिक तालवाद्ये वाजवली होती.

लौकिक भोगले हा पुणे विद्यापीठात पुढे होणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय लोक वाद्यवृंदासाठी कला सादर करणार आहे. लौकिक भोगले याचे पखवाज वादनाचे शिक्षण प्रसिद्ध पखवाज विशारद मसुरे गावचे सुपुत्र गुरुवर्य श्री सचिन कातवणकर सर यांच्या कडे चालू आहे. लौकिक भोगले सध्या विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनीरिंग चे शिक्षण घेत आहे.
लौकिक याच्या यशाबद्दल उद्योजक दीपक परब, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, छोटू ठाकूर, सरोज परब, महेश बागवे, विलास मेस्त्री, सौ शर्वरी सावंत, श्रीकांत सावंत यांनी अभिनंदन केले असून त्याचे मसुरे गावातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!