29.3 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आमदार वैभव नाईक यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज केला दाखल.

- Advertisement -
- Advertisement -

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसैनिकांची अलोट गर्दी आणि मविआ नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती.

आमच्याकडे मशालीचे शिवतेज आहे आणि कुडाळ मालवण विधानसभेसाठी आमदार वैभव नाईकांचीच संपूर्ण क्रेझ आहे,’ अशी व्यक्त होती प्रतिक्रिया.

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आमदार वैभव नाईक यांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणार आमदार वैभव नाईक यांची सभा पार पडली. रणरणत्या उन्हात घामाच्या धारा वाहत असताना देखील कुडाळ मालवणचे नागरिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची भाषणे ऐकत होती हे या सभेचे विशेष होते. ‘आमच्या मशालीला शिवतेज आहे आणि कुडाळ मालवण विधानसभेसाठी आमदार वैभव नाईकांचीच संपूर्ण क्रेझ आहे’ अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त होत होती.

सभा संपल्यानंतर कुडाळ शहरातुन मुख्य रस्त्याने प्रांताधिकारी कार्यालयाकडे हजारो लोकांचा जनसमुदाय आमदार वैभव नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मार्गस्थ झाला. भगवे झेंडे,भगव्या शाली, भगव्या टोप्या परिधान करून ढोल ताशांच्या गजरात व डीजेच्या ठेक्यावर कुडाळ मालवणची जनता रॅलीत सहभागी झाली होती. त्यामुळे संपूर्ण कुडाळ शहराचे वातावरण भगवेमय झाले होते. सर्व स्तरातील अबाल वृद्धांनी यानिमित्ताने आमदार वैभव नाईक यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी मंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, व्हिक्टर डांटस, प्रसाद रेगे , उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख उपनेत्या जान्हवी सावंत, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख संग्राम प्रभूगांवकर, जिल्हाप्रमुख नीलम पालव, श्रेया परब, मालवण हरी खोबरेकर, राजन नाईक, बबन बोभाटे, जिल्हा प्रवक्त्ते मंदार केणी, मालवणचे माजी नगरसेवक यतीन खोत, माजी नगरसेवक नितीन वाळके, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, मालवण शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, मालवण उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, उपशहरप्रमुख सन्मेष उर्फ राजू परब, अभय शिरसाट, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, अतुल बंगे, सचिन कदम, बाळा कोरगांवकर, अनुप नाईक,किरण शिंदे, संतोष शिरसाट, तपस्वी मयेकर, राजेश गांवकर, युवतीसेना जिल्हा प्रमुख निनाक्षी शिंदे मेथर युवतीसेना प्रमुख अधिकारी शिल्पा खोत, उदय मांजरेकर, योगेश धुरी, मालवण युवासेना तालुका प्रमुख समन्वयक मंदार ओरसकर, उमेश चव्हाण, अक्षय रेवंडकर, महिला तालुका संघटक पूनम चव्हाण, दीपा शिंदे, स्नेहा डिचवलकर, स्नेहा दळवी, मथुरा राऊळ, सुशील चिंदरकर, श्रेया गवंडे, अन्वय प्रभू, रश्मीन रोगे, अक्षय भोसले, नितीन राऊळ, दत्तगुरु पोईपकर, गौरी मयेकर सावंत, शेखर उर्फ धनंजय गावडे, आदींसह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते कुडाळ मालवणची जनता हजारोंच्या संख्येने उपस्थित होती.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसैनिकांची अलोट गर्दी आणि मविआ नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती.

'आमच्याकडे मशालीचे शिवतेज आहे आणि कुडाळ मालवण विधानसभेसाठी आमदार वैभव नाईकांचीच संपूर्ण क्रेझ आहे,' अशी व्यक्त होती प्रतिक्रिया.

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आमदार वैभव नाईक यांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणार आमदार वैभव नाईक यांची सभा पार पडली. रणरणत्या उन्हात घामाच्या धारा वाहत असताना देखील कुडाळ मालवणचे नागरिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची भाषणे ऐकत होती हे या सभेचे विशेष होते. 'आमच्या मशालीला शिवतेज आहे आणि कुडाळ मालवण विधानसभेसाठी आमदार वैभव नाईकांचीच संपूर्ण क्रेझ आहे' अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त होत होती.

सभा संपल्यानंतर कुडाळ शहरातुन मुख्य रस्त्याने प्रांताधिकारी कार्यालयाकडे हजारो लोकांचा जनसमुदाय आमदार वैभव नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मार्गस्थ झाला. भगवे झेंडे,भगव्या शाली, भगव्या टोप्या परिधान करून ढोल ताशांच्या गजरात व डीजेच्या ठेक्यावर कुडाळ मालवणची जनता रॅलीत सहभागी झाली होती. त्यामुळे संपूर्ण कुडाळ शहराचे वातावरण भगवेमय झाले होते. सर्व स्तरातील अबाल वृद्धांनी यानिमित्ताने आमदार वैभव नाईक यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी मंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, व्हिक्टर डांटस, प्रसाद रेगे , उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख उपनेत्या जान्हवी सावंत, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख संग्राम प्रभूगांवकर, जिल्हाप्रमुख नीलम पालव, श्रेया परब, मालवण हरी खोबरेकर, राजन नाईक, बबन बोभाटे, जिल्हा प्रवक्त्ते मंदार केणी, मालवणचे माजी नगरसेवक यतीन खोत, माजी नगरसेवक नितीन वाळके, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, मालवण शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, मालवण उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, उपशहरप्रमुख सन्मेष उर्फ राजू परब, अभय शिरसाट, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, अतुल बंगे, सचिन कदम, बाळा कोरगांवकर, अनुप नाईक,किरण शिंदे, संतोष शिरसाट, तपस्वी मयेकर, राजेश गांवकर, युवतीसेना जिल्हा प्रमुख निनाक्षी शिंदे मेथर युवतीसेना प्रमुख अधिकारी शिल्पा खोत, उदय मांजरेकर, योगेश धुरी, मालवण युवासेना तालुका प्रमुख समन्वयक मंदार ओरसकर, उमेश चव्हाण, अक्षय रेवंडकर, महिला तालुका संघटक पूनम चव्हाण, दीपा शिंदे, स्नेहा डिचवलकर, स्नेहा दळवी, मथुरा राऊळ, सुशील चिंदरकर, श्रेया गवंडे, अन्वय प्रभू, रश्मीन रोगे, अक्षय भोसले, नितीन राऊळ, दत्तगुरु पोईपकर, गौरी मयेकर सावंत, शेखर उर्फ धनंजय गावडे, आदींसह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते कुडाळ मालवणची जनता हजारोंच्या संख्येने उपस्थित होती.

error: Content is protected !!