28 C
Mālvan
Sunday, April 27, 2025
IMG-20240531-WA0007
IMG-20250426-WA0000

बांदा पोलीसांच्या कारवाईत बेकायदेशीर दारुसह १ कोटी ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : बांदा पोलीस तपासणी नाक्यावर गोव्यातून नालासोपारा येथे बेकायदा होणाच्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांनी चेकपोस्टवर कारवाई केली. या कारवाईत ८६ लाख ४০ हजार रुपयांची दारू व २० लाखांचा ट्रक असा एकूण १ कोटी ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदेशीर पणे दारू वाहतुक केल्याबद्दल शिवाजी महादेव शिंगाडे (वय ५३) व विद्यासागर बापू ऐतवडे (वय ४०, दोघेही रा. बेडग, मिरज, सांगली) यांच्यासह विनापरवाना दारू मुद्देमाल भरून देणार्या दोघा अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे, सहाय्यक पोलीस फौजदार पालकर, हवालदार धनंजय नाईक, पोलीस नाईक वाघाटे, पोलीस शिपाई कापसे, पोलीस हवालदार सिताकांत नाईक, कोळेकर यांच्या पथकाने रविवारी इन्सुली पोलीस चेकपोस्टवर केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्भूमीवर चेकपोस्टवर वाहनांची कडक तपासणी सुरू आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : बांदा पोलीस तपासणी नाक्यावर गोव्यातून नालासोपारा येथे बेकायदा होणाच्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांनी चेकपोस्टवर कारवाई केली. या कारवाईत ८६ लाख ४০ हजार रुपयांची दारू व २० लाखांचा ट्रक असा एकूण १ कोटी ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदेशीर पणे दारू वाहतुक केल्याबद्दल शिवाजी महादेव शिंगाडे (वय ५३) व विद्यासागर बापू ऐतवडे (वय ४०, दोघेही रा. बेडग, मिरज, सांगली) यांच्यासह विनापरवाना दारू मुद्देमाल भरून देणार्या दोघा अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे, सहाय्यक पोलीस फौजदार पालकर, हवालदार धनंजय नाईक, पोलीस नाईक वाघाटे, पोलीस शिपाई कापसे, पोलीस हवालदार सिताकांत नाईक, कोळेकर यांच्या पथकाने रविवारी इन्सुली पोलीस चेकपोस्टवर केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्भूमीवर चेकपोस्टवर वाहनांची कडक तपासणी सुरू आहे.

error: Content is protected !!