28.2 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

अवैध मासेमारी करणारा ट्राॅलर पकडला.

- Advertisement -
- Advertisement -

मच्छिमारी नेते पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत दिला होता इशारा.

मालवण | प्रतिनिधी : नवीन मासेमारी हंगाम सुरु झाल्यापासून, मालवण तालुक्यातील विविध स्थानिक मच्छिमारांनी, परराज्यातील ट्राॅलर्स अवैधरात्या महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात घुसून मासेमारी करत असल्या संदर्भात कैफियत मांडली होती. मालवणचे पारंपरिक मच्छिमार नेते पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांनी या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. १९ ऑक्टोबरला कर्नाटक- मलपी येथील नौका वायुपुत्र-२ क्रमांक आयएनडी – केए- ०२ एमएम – ५८१२ महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात अवैध मासेमारी करताना पकडण्यात आली. या नौका मालकाविरुद्ध महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी दिली आहे. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग – मालवण सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९ ऑक्टोबरला रात्री सागरी गस्ती दरम्यान परवाना अधिकारी मुरारी भालेकर सोबत सहकारी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक, रक्षक दीपेश मायबा, सागर परब, मिमोह जाधव, राजेश कुबल, प्रणित मुणगेकर, स्वप्नील सावजी, पोलीस कॉन्स्टेबल व्ही. व्ही. पाटोळे यांनी कर्नाटक- मलपी येथील नौका वायुपुत्र-२ क्रमांक आयएनडी – केए- ०२ एमएम – ५८१२ महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात अवैध मासेमारी करताना पकडण्यात आली आहे. ही नौका मालकाविरुद्ध महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी दिली आहे.

पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी ( मच्छिमार नेते, मालवण, सिंधुदुर्ग. )

मलपी येथील ट्रॉलर्सनी महाराष्ट्र जलधी क्षेत्रात घुसत अवैध मच्छिमारी सुरु केली असल्याचे मच्छिमार नेते पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांना समजताच रात्री त्यांनी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनीरुन लक्ष वेधत कारवाईची मागणी केली कारवाई न केल्यास समुद्रात उतरायचा इशारा दिला. त्यानंतर संबंधित अधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व आश्वस्त केले . त्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्तीनौकेने कारवाई करत मलपी येथील ट्रॉलर पकडण्याची कारवाई केली.

मालवण सागरी किनारपट्टी भागात कर्नाटक मलपी तसेच अन्य राज्यातील हायस्पीड ट्रॉलर गेले काही दिवस सातत्याने मोठ्या संख्येने घुसखोरी करून रात्रीच्या वेळी मासळीची लूट करतात. स्थानिक मच्छिमारांची जाळी तोडून नुकसान करतात. असे असताना एका ट्रॉलरवर कारवाई नको तर अधिक कारवाई झाली पाहिजे. तसेच पकडलेल्या हायस्पीड ट्रॉलरवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आक्रमक भूमिका मच्छिमारांनी मांडली आहे.

दरम्यान मत्स्य विभागाने केलेली ही कारवाई अत्यंत प्रशंसनीय आहे अशा प्रतिक्रिया येत असून ही कारवाई आता इथेच थांबता नये तर अवैध मच्छिमारीला अशा कारवाईचे धडक सत्र सुरु राह्यले पाहिजे असा सूरही आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मच्छिमारी नेते पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत दिला होता इशारा.

मालवण | प्रतिनिधी : नवीन मासेमारी हंगाम सुरु झाल्यापासून, मालवण तालुक्यातील विविध स्थानिक मच्छिमारांनी, परराज्यातील ट्राॅलर्स अवैधरात्या महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात घुसून मासेमारी करत असल्या संदर्भात कैफियत मांडली होती. मालवणचे पारंपरिक मच्छिमार नेते पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांनी या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. १९ ऑक्टोबरला कर्नाटक- मलपी येथील नौका वायुपुत्र-२ क्रमांक आयएनडी - केए- ०२ एमएम - ५८१२ महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात अवैध मासेमारी करताना पकडण्यात आली. या नौका मालकाविरुद्ध महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी दिली आहे. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग - मालवण सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९ ऑक्टोबरला रात्री सागरी गस्ती दरम्यान परवाना अधिकारी मुरारी भालेकर सोबत सहकारी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक, रक्षक दीपेश मायबा, सागर परब, मिमोह जाधव, राजेश कुबल, प्रणित मुणगेकर, स्वप्नील सावजी, पोलीस कॉन्स्टेबल व्ही. व्ही. पाटोळे यांनी कर्नाटक- मलपी येथील नौका वायुपुत्र-२ क्रमांक आयएनडी - केए- ०२ एमएम - ५८१२ महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात अवैध मासेमारी करताना पकडण्यात आली आहे. ही नौका मालकाविरुद्ध महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी दिली आहे.

पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी ( मच्छिमार नेते, मालवण, सिंधुदुर्ग. )

मलपी येथील ट्रॉलर्सनी महाराष्ट्र जलधी क्षेत्रात घुसत अवैध मच्छिमारी सुरु केली असल्याचे मच्छिमार नेते पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांना समजताच रात्री त्यांनी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनीरुन लक्ष वेधत कारवाईची मागणी केली कारवाई न केल्यास समुद्रात उतरायचा इशारा दिला. त्यानंतर संबंधित अधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व आश्वस्त केले . त्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्तीनौकेने कारवाई करत मलपी येथील ट्रॉलर पकडण्याची कारवाई केली.

मालवण सागरी किनारपट्टी भागात कर्नाटक मलपी तसेच अन्य राज्यातील हायस्पीड ट्रॉलर गेले काही दिवस सातत्याने मोठ्या संख्येने घुसखोरी करून रात्रीच्या वेळी मासळीची लूट करतात. स्थानिक मच्छिमारांची जाळी तोडून नुकसान करतात. असे असताना एका ट्रॉलरवर कारवाई नको तर अधिक कारवाई झाली पाहिजे. तसेच पकडलेल्या हायस्पीड ट्रॉलरवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आक्रमक भूमिका मच्छिमारांनी मांडली आहे.

दरम्यान मत्स्य विभागाने केलेली ही कारवाई अत्यंत प्रशंसनीय आहे अशा प्रतिक्रिया येत असून ही कारवाई आता इथेच थांबता नये तर अवैध मच्छिमारीला अशा कारवाईचे धडक सत्र सुरु राह्यले पाहिजे असा सूरही आहे.

error: Content is protected !!