न्यूझिलंड समोर पहिला डाव सर्वबाद ४६ ; पाच फलंदाज भोपळाही न फोडता माघारी.
क्रीडा : टी ट्वेंटीतील विक्रमी धावसंख्या आणि मालिका विजयाने भारावलेल्या प्रशिक्षक गौतम गंभीरच्या टीम इंडियाचे कसोटीतील ज्येष्ठ आणि युवा असे दोन्ही शिलेदार न्यूझिलंडच्या मध्यम जलदगती मार्यासमोर अक्षरशः कोसळले. न्यूझिलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस पावसाने वाया गेल्यानंतर दुसर्या दिवशी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. त्यानंतर सलामीवीर यशस्वी जयस्वाल ६३ चेंडूत १३ धावा वगळता एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकता आले नाही. भारताच्या पाच फलंदाजांना भोपळा सुद्धा फोडता आला नाही.
न्यूझिलंड तर्फे गोलंदाज मॅट हेन्रीने ५ बळी तर नवोदीत ऑर्कनै ४ बळी मिळवले. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा न्यूझिलंडच्या तीन षटकात बिनबाद १० धावा झाल्या होत्या.