मालवण | ब्युरो न्यूज : मालवणातचे प्रवेशद्वार असलेल्या देऊळवाडा मुख्य मार्गांवरील काही झाडांच्या फ़ांद्या वाहतूकीस अडथळा ठरत होत्या. काही वेळा मोठी वाहने गेल्यावर त्याना या फ़ांद्या अडकणे, वीज तारा तुटून वीज पुरवठा खंडित होणे असे प्रकार वारंवार घडत होते. या बाबत नागरिकांनी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचे लक्ष वेधले होते. दीपक पाटकर यांनी नेमकी वस्तुस्थिती जाणून घेतली. ज्या नागरिकांची झाडे आहेत त्यांच्याधी चर्चा केली. त्या नंतर वीज अधिकारी यांची भेट घेतली. यानंतर वाहतुकीला धोकादायक ठरणारी तसेच वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडून घेत मार्ग मोकळा केला. दीपक पाटकर यांना कोणतेही सामाजिक काम, समस्या सांगा ते त्यावर मार्ग काढतात. त्यांचे कार्य खऱ्या अर्थाने कार्यसम्राट असेच आहे अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली व त्यांचे आभार मानले.
यावेळी दीपक पाटकर यांसह माजी नगरसेवक जगदीश गावकर, संतोष इब्राहिमपुरकर, संदेश वाळके, जितू वाळके, सुमित बांदेकर, भूषण डिचोलकर, बाबू आंब्रडकर, बबली आंब्रडकर, युवानेते ललित चव्हाण, शुभ्रा मालवणकर, ईदा आंब्रडकर, दिनेश डिचोलकर यांसह स्थानिक नागरीक उपस्थित होते. आपा बांदेकर, संदेश वाळके, जितू वाळके यांचे तसेच सुहास वालावलकर, शुभ्रा मालवणकर यांचे विशेष सहकार्य लाभले असे सांगत दीपक पाटकर यांनी खास आभार मानले आणि या कामात सहकार्य केलेले वीज वितरणचे अधिकारी श्री. मेहेत्रे, श्री. मयेकर यांसह वायरमन देऊलकर, जांभवडेकर, मेस्त्री यांचे दीपक पाटकर यांनी नागरिकांच्या वतीने आभार मानले.