मळगांव | नितीन गावडे : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व न्हावेली हिंदूप्रेमी यांनी आयोजित केलेल्या न्हावेली गावातील श्री ‘दुर्गामाता दौड’ला हिंदूप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात हिंदू धर्मांविषयी जनजागृती करण्यासाठी व धर्माभिमान जागृत करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे दरवर्षी घटस्थापना ते विजयादशमी पर्यंत श्री दुर्गामाता दौड चे आयोजन करण्यात येते.
१९८२ साली संभाजी भिडे यांनी सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या वतीने या दुर्गामाता दौडीस सुरुवात केली होती. तरुणांमध्ये हिंदू धर्माविषयी जागृती व्हावी यासाठी हा कार्यक्रम केला जातो.
या श्री दुर्गामाता दौड ची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. त्यानंतर सर्व हिंदू शिवभक्त, शिवप्रेमी, शिवप्रतिष्ठानचे धारकरी यांच्यासह गावतील तरुण भगवा झेंडा घेऊन न्हावेली जि. प. शाळा नंबर. ४ कडून, पार्सेकरवाडी, माऊली मंदीर देऊळवाडी, नागझर वाडी, मेस्त्री वाडी, हरीजन वाडी, टेंबवाडी अश्याप्रकारे गावात फिरुन छञपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवराय चा जयघोष करत हिंदू एकतेचे दर्शन घडवले.
न्हावेलीतील या ‘श्री दुर्गामाता दौड’ मध्ये शेकडो शिवभक्त, शिवप्रेमी, धर्माभिमानी तरुण एकत्र आले. डोक्यावर भगवा फेटा परिधान करून राष्ट्रप्रेमाने भारावलेले तरुण दौडीसाठी सज्ज झाले. यामध्ये गावातील मोठ्या प्रमाणावर लहान मुले, महिला, पुरुष पारंपरिक धार्मिक वेशभूषेत सहभागी झाले होते. लहान मुलांनी झाशीची राणी, संत नामदेव, विठ्ठल अश्या वेशभूषा करून सहभाग घेतला.
राष्ट्रभक्ती-धर्मभक्तीच्या मार्गावर जोमाने चालण्याचे बळ आणि अवघी तरुण पिढी सशक्त निर्व्यसनी राष्ट्रभक्त, बनवण्यासाठी दुर्गामाता दौड प्रेरणादायी असल्याचे या दौड च्या समाप्ती वेळी धारकऱ्यांनी सांगितले. या दुर्गामाता दौड मध्ये न्हावेली गावचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्यासह तंटामुक्तीअध्यक्ष गजा दळवी, नितेशा नाईक, शिवप्रेमी समिर पार्सेकर ,ओम पार्सेकर, रुपेश नाईक, तुळशीदास पार्सेकर, राज धवण, सगुण नाईक, रेश्मा नेमण, दादा परब, अजय पार्सेकर,सिद्धेश पार्सकर ग्रा.प.सदस्य आरती माळकर, बाळू सावळ, उदय परब, प्रणव नेमण, कुणाल पार्सेकर, किशोर पार्सेकर, नाना नाईक, अमोल पार्सेकर, कुणाल पार्सेकर, संजय दळवी, गुंडू पार्सेकर, पुनीत नाईक, अजय नाईक यांच्यासह गावातील शिवप्रेमी, हिंदुत्ववादी संघटना कार्येकर्ते, शिवप्रतिष्ठानचे धारकरी, महिला, युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.