पत्रकारांच्या महामंडळाला मिळाली मंजुरी.
मुंबई | प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पत्रकारांसाठी आणि वृतपत्र विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या कॅबिनेट बैठकीत जवळपास ८० निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती दिली.
देशातील प्रथम क्रमांकाची असलेली पत्रकार संघटना व्हाॅईस ऑफ मिडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरु होता. यामध्ये व्हाॅईस ऑफ मिडियाचे राष्ट्रीय व राज्य पदाधिकारी तसेच देशातील हजारो सदस्यांनी वेळोवेळी योगदान दिले आहे. व्हाॅईस ऑफ मिडियाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष परेश राऊत व कार्याध्यक्ष समीर म्हाडेश्वर, खजिनदार शैलेश मयेकर, सल्लागार बी एन खरात तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य व व्हाॅईस ऑफ मिडियाचे सदस्य पत्रकार यांनी ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर यासंदर्भात आंदोलन केले होते. याबाबत व्हाॅईस ऑफ मिडिया चे देशातील विविध पत्रकारिता घटकांकडून अभिनंदन होत आहे.