मळगांव | नितिन गावडे : सध्याच्या घडीला शिक्षणासोबत मुलांना संगीताची गोडी निर्माण व्हावी, मुलांनी कला साधनांकडे वळावे, यासाठी मळगांव इंग्लिश स्कूल, मळगांव मधील विद्यार्थ्यांसाठी ‘साधना कला अकादमी’ स्थापन करण्यात आली आहे. दिनांक ७ ऑक्टोबर रोजी मळगांव इंग्लिश स्कूल मळगाव या ठिकाणी कला साधना कला अकादमीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भगीरथ प्रतिष्ठान चे डॉक्टर प्रसाद देवधर उपस्थित होते. या अकादमीसाठी भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रसाद देवधर यांनी शाळेसाठी पेटी, तबला, ढोलकी, चायना ब्लॉक तसेच मंजिरी असे साहित्य पुरविले.


या कार्यक्रमासाठी संस्था सचिव आर आर राऊळ यांनी दूरध्वनी वरुन डॉक्टर देवधर, स्कूल कमिटी तसेच नवीन चालू करण्यात आलेल्या साधना कला अकादमीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.