28.3 C
Mālvan
Thursday, November 14, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Sawant ASN
ADTV Dhondi Chindarkar ASN
IMG-20241113-WA0000

आम्ही खूप भोगतोय जिल्हाधिकारी साहेब आता न्याय द्या अन्यथा आम्हालाच समुद्रात उतरावे लागेल…!

- Advertisement -
- Advertisement -

मच्छिमार नेते बाबी जोगी यांचा प्रसिद्धीपत्राद्वारे इशारा.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे मच्छिमार नेते पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे शासन तथा जिल्हाधिकारी आणि मत्स्यविभाग यांना इशारा दिला आहे. प्रसिद्धीपत्रात बाबी जोगी यांनी म्हणले आहे की आजच्या स्थितीला मच्छीमाऱांना मासे मिळणे कठीण झाले आहे. शेजारच्या कर्नाटक मलपी तथा परराज्यातील शेकडो बोटी मासेमारीसाठी धुमाकूळ घालत आहेत. या बोटी, दोन मोठ्या बोटींच्या जाळीच्या सहाय्याने सहाय्याने एक जाळे ओढतात. याला ‘जोत’ असे म्हणतात व या प्रकाराला शासनाची मनाई आहे तरी हे प्रकार घडतात. अशा शेकडो बोटी बारा वावा पासना बाहेर समुद्रात सर्व मासा गाळून काढत आहेत. त्यामुळे समुद्रात व किनाऱ्यावरती मासा टिकत नाही त्याचा परिणाम स्थानिक सर्वच छोट्या – मोठ्या मच्छीमाऱ्यांना भोगावा लागत आहे. परिणामी सिंधुदुर्ग व मालवणचा मच्छीमार पूर्ण आर्थिक अडचणीमध्ये आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य मच्छिमाराला दाद मिळत नाही. मत्स्यविभाग ही केवळ एक प्रशासकीय इमारत असून त्यामधील यंत्रणेची सूत्रे सामान्य मच्छिमारांसाठी नसून ती आणखी कोणाच्यातरी हातात आहेत का असा प्रश्न मच्छिमारांना भेडसावत आहे. जिल्ह्यातील सामान्य मच्छिमारांच्या पोटापाण्याच्या भूलभूत प्रश्नांना कोणी वालीच नसेल तर आम्हालाच समुद्रात उतरावे लागेल असे मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी म्हणले आहे. मच्छिमारांना रोजगार हा समुद्रातील मासेमारीच आहे परंतु तोच मासा जर परराज्यातील मच्छिमार चोरून नेत असेल तर आम्ही खायचे काय, प्रपंच कसा चालवायचा, लेकराबाळांची शिक्षण व आरोग्य याचा मेळ कसा जमवायचा याची शासनाला चिंता नसेल तर आम्हाला समुद्रात उतरावे लागले तर जबाबदार सुद्धा केवळ मच्छी खाते आणि सन्माननीय जिल्हाधिकारी असतील असे पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळवले आहे.

परराज्यातील नौकांची मासेमारी व अवैध मासेमारी याबद्दल शासनाला शेकडो निवेदने दिली गेली आहेतच परंतु आतातरी सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आम्हाला तत्काळ न्याय मिळणे ही सध्याच्या कठीण काळाची आवश्यकता आहे असे मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी म्हणले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मच्छिमार नेते बाबी जोगी यांचा प्रसिद्धीपत्राद्वारे इशारा.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे मच्छिमार नेते पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे शासन तथा जिल्हाधिकारी आणि मत्स्यविभाग यांना इशारा दिला आहे. प्रसिद्धीपत्रात बाबी जोगी यांनी म्हणले आहे की आजच्या स्थितीला मच्छीमाऱांना मासे मिळणे कठीण झाले आहे. शेजारच्या कर्नाटक मलपी तथा परराज्यातील शेकडो बोटी मासेमारीसाठी धुमाकूळ घालत आहेत. या बोटी, दोन मोठ्या बोटींच्या जाळीच्या सहाय्याने सहाय्याने एक जाळे ओढतात. याला 'जोत' असे म्हणतात व या प्रकाराला शासनाची मनाई आहे तरी हे प्रकार घडतात. अशा शेकडो बोटी बारा वावा पासना बाहेर समुद्रात सर्व मासा गाळून काढत आहेत. त्यामुळे समुद्रात व किनाऱ्यावरती मासा टिकत नाही त्याचा परिणाम स्थानिक सर्वच छोट्या - मोठ्या मच्छीमाऱ्यांना भोगावा लागत आहे. परिणामी सिंधुदुर्ग व मालवणचा मच्छीमार पूर्ण आर्थिक अडचणीमध्ये आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य मच्छिमाराला दाद मिळत नाही. मत्स्यविभाग ही केवळ एक प्रशासकीय इमारत असून त्यामधील यंत्रणेची सूत्रे सामान्य मच्छिमारांसाठी नसून ती आणखी कोणाच्यातरी हातात आहेत का असा प्रश्न मच्छिमारांना भेडसावत आहे. जिल्ह्यातील सामान्य मच्छिमारांच्या पोटापाण्याच्या भूलभूत प्रश्नांना कोणी वालीच नसेल तर आम्हालाच समुद्रात उतरावे लागेल असे मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी म्हणले आहे. मच्छिमारांना रोजगार हा समुद्रातील मासेमारीच आहे परंतु तोच मासा जर परराज्यातील मच्छिमार चोरून नेत असेल तर आम्ही खायचे काय, प्रपंच कसा चालवायचा, लेकराबाळांची शिक्षण व आरोग्य याचा मेळ कसा जमवायचा याची शासनाला चिंता नसेल तर आम्हाला समुद्रात उतरावे लागले तर जबाबदार सुद्धा केवळ मच्छी खाते आणि सन्माननीय जिल्हाधिकारी असतील असे पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळवले आहे.

परराज्यातील नौकांची मासेमारी व अवैध मासेमारी याबद्दल शासनाला शेकडो निवेदने दिली गेली आहेतच परंतु आतातरी सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आम्हाला तत्काळ न्याय मिळणे ही सध्याच्या कठीण काळाची आवश्यकता आहे असे मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी म्हणले आहे.

error: Content is protected !!