22.8 C
Mālvan
Tuesday, January 28, 2025
IMG-20240531-WA0007

कुडाळ – मालवण मध्ये महायुतीचा विजय निश्चित : ऋत्विक सामंत.

- Advertisement -
- Advertisement -

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : कुडाळ मालवण युवासेना जिल्हाप्रमुख ॠत्विक सामंत यांनी शिवसेना महायुतीचे विधानसभा उमेदवार निलेश राणे यांचा विजय निश्चित असल्याचे प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे.

ॠत्विक सामंत म्हणतात की, आज महाराष्ट्रात महायुतीची म्हणजे सजग विचारांचे, छत्रपती शिवरायांच्या विचारांवर कार्यरत असणारं सरकार येणं ही काळाची गरज आहे. नुसताच आमदार निवडून द्यायचा नाही तर तुमच्या आमच्या राज्यासाठी एक व्हिजन असणारा व्यक्ती म्हणजे निलेश नारायण राणे यांना आपण सर्वांनी निवडून देणं हे आपलं प्रत्येकाचं एक राष्ट्र कर्तव्य म्हणून आपण यावेळी आवर्जून मतदान करायचं आहे आणि इतरांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे.आज आपल्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून श्री निलेश राणे हे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. निलेश राणेच आमदार म्हणून निवडून आले पाहिजेत कारण या मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज एवढाच विकास आपल्याला अपेक्षित नसून आज महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या आणि पुन्हा एकदा स्थापन होणार या महायुतीच्या सरकार मधे एक सुशिक्षित, समाजाप्रती तळमळ असणारा आणि एक समृद्ध आणि विकसित मतदारसंघ बनविण्याचे व्हिजन समोर ठेऊन काम करण्याचं ध्येय ठेवणारा आमदार म्हणून श्री निलेश राणे यांना आपण सर्वांनी भरघोस मतांनी निवडून देणं आवश्यक आहे. श्री निलेश राणे मागील तीन वर्ष कुठल्याही संविधानात पदावर नसताना या मतदारसंघातील प्रत्येक गावा गावातील सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी सोडवण्यांच काम अगदी मनापासून करत आहेत. ज्या मतदारसंघात ‘नारायणराव राणे यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात एक आपुलकीचं, कुटुंबातील व्यक्ती म्हणून स्थान आपल्या कर्तृत्वाने मिळवून हा मतदारसंघ एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला त्याच सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचं उद्दीष्ट – ध्येय डोळ्यासमोर ठेवून आज श्री निलेश राणे विधानसभेचे उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभे आहेत. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघातून पहिल्या ५ सर्वोच्च मताधिक्य मिळवलेल्या आमदारांमध्ये आपला आमदार म्हणून श्री. निलेश राणे यांना आपण पाठवून पुढच्या पाच वर्षाच्या आत हा कुडाळ मालवण मतदारसंघ महाराष्ट्रातील एक आदर्श मतदार संघ बनविण्यासाठी त्यांचे हात बळकट करुया. उद्याचा सक्षम, समृद्ध, विकसित महाराष्ट्र बनत असताना आपला हक्काचा आमदार आपण विधीमंडळात पाठवून, आपण राष्ट्र उभारणीत आपलं स्वतःचं भरघोस योगदान मतदानाच्या कर्तव्यातून करावं असे आवाहन कुडाळ मालवण युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : कुडाळ मालवण युवासेना जिल्हाप्रमुख ॠत्विक सामंत यांनी शिवसेना महायुतीचे विधानसभा उमेदवार निलेश राणे यांचा विजय निश्चित असल्याचे प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे.

ॠत्विक सामंत म्हणतात की, आज महाराष्ट्रात महायुतीची म्हणजे सजग विचारांचे, छत्रपती शिवरायांच्या विचारांवर कार्यरत असणारं सरकार येणं ही काळाची गरज आहे. नुसताच आमदार निवडून द्यायचा नाही तर तुमच्या आमच्या राज्यासाठी एक व्हिजन असणारा व्यक्ती म्हणजे निलेश नारायण राणे यांना आपण सर्वांनी निवडून देणं हे आपलं प्रत्येकाचं एक राष्ट्र कर्तव्य म्हणून आपण यावेळी आवर्जून मतदान करायचं आहे आणि इतरांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे.आज आपल्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून श्री निलेश राणे हे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. निलेश राणेच आमदार म्हणून निवडून आले पाहिजेत कारण या मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज एवढाच विकास आपल्याला अपेक्षित नसून आज महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या आणि पुन्हा एकदा स्थापन होणार या महायुतीच्या सरकार मधे एक सुशिक्षित, समाजाप्रती तळमळ असणारा आणि एक समृद्ध आणि विकसित मतदारसंघ बनविण्याचे व्हिजन समोर ठेऊन काम करण्याचं ध्येय ठेवणारा आमदार म्हणून श्री निलेश राणे यांना आपण सर्वांनी भरघोस मतांनी निवडून देणं आवश्यक आहे. श्री निलेश राणे मागील तीन वर्ष कुठल्याही संविधानात पदावर नसताना या मतदारसंघातील प्रत्येक गावा गावातील सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी सोडवण्यांच काम अगदी मनापासून करत आहेत. ज्या मतदारसंघात 'नारायणराव राणे यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात एक आपुलकीचं, कुटुंबातील व्यक्ती म्हणून स्थान आपल्या कर्तृत्वाने मिळवून हा मतदारसंघ एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला त्याच सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचं उद्दीष्ट - ध्येय डोळ्यासमोर ठेवून आज श्री निलेश राणे विधानसभेचे उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभे आहेत. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघातून पहिल्या ५ सर्वोच्च मताधिक्य मिळवलेल्या आमदारांमध्ये आपला आमदार म्हणून श्री. निलेश राणे यांना आपण पाठवून पुढच्या पाच वर्षाच्या आत हा कुडाळ मालवण मतदारसंघ महाराष्ट्रातील एक आदर्श मतदार संघ बनविण्यासाठी त्यांचे हात बळकट करुया. उद्याचा सक्षम, समृद्ध, विकसित महाराष्ट्र बनत असताना आपला हक्काचा आमदार आपण विधीमंडळात पाठवून, आपण राष्ट्र उभारणीत आपलं स्वतःचं भरघोस योगदान मतदानाच्या कर्तव्यातून करावं असे आवाहन कुडाळ मालवण युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत यांनी केले आहे.

error: Content is protected !!