नितिन गावडे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या आजगांव येथील सेंट फ्रान्सिस झेवियर्स हायस्कूल जवळील गतिरोधक वरील पांढरे पट्टे धुसर झाल्याने तेथील स्पीडब्रेकर हा धोकादायक बनला आहे. या रोडवर महाविद्यालय, शाळेतील विद्यार्थी तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हा रस्ता पुढे शिरोडा बाजारपेठेत जाणारा असल्याने येथे मोठ्या प्रमाणात गाड्यांची ये जा सुरू असते. वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गतीरोधक बसविण्यात आला आहे मात्र त्यांवर रंगवण्यात येणारे पांढरे पट्टे कालांतराने धुसर होऊन ते पट्टे दिसेनासे झालेत. त्यामुळे वाहनचालकांना व खासकरुन या रसत्यावर नवीन असलेल्या चालकांना वाहनावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे.
या गतीरोधकावर लवकरात लवकर पांढरे पट्टे रंगवून त्यावर रिप्लेक्टर बसविण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.