कुंभारमाठ येथे स्वागत व त्यानंतर भव्य रॅली ; सायंकाळी ५ वाजता व्याख्यानासाठी बंदरजेटी येथे उपस्थितीचे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व शिवसेना पदाधिकार्यांचे आवाहन.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरात, २६ ऑगस्ट रोजी राजकोट किल्ला येथील शिवपुतळा कोसळल्याच्या दुर्घटना प्रकरणी दोषींवर कारवाई होण्यासाठी शिवसन्मान यात्रेचे आयोजन करण्याचे आले आहे. याच पार्श्वभूमीवर दिशादर्शक मार्गदर्शन करून पुढील दिशा ठरविण्यासाठी शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील हे आज सायंकाळी ५ वाजता बंदरजेटी याठिकाणी जाहीर सभेसाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिवप्रेमींनी उपस्थित राहवे असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.
शिवव्याख्याते पाटील यांचे शिवसेनेच्या वतीने कुंभारमाठ याठिकाणी भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्याठिकाणी शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर दुचाकी रॅलीने बंदरजेटी याठिकाणी त्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर शिवप्रेमींसमोर ते आपले विचार मांडणार आहेत. तरी जिल्हा भरातील शिवप्रेमींनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन हरी खोबरेकर यांनी केले आहे.