28.6 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

ज्येष्ठ क्रीडा शिक्षक रमेश गोवेकर कालवश.

- Advertisement -
- Advertisement -

आचरा | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील आचरा समर्थनगर येथील निवासी तसेच आचरा हायस्कूलचे माजी क्रीडाशिक्षक रमेश घनःश्याम गोवेकर ( वय ८४ वर्षे) यांचे शुक्रवारी, ४ ऑक्टोबर रोजी पहाटे निधन झाले. राज्य स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धेत अनेक विद्यार्थी घडवत त्यांनी नावारुपाला आणले होते. कडक शिस्तीचे आणि प्रेमळ, उत्साही, हसतमुख व क्रियाशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. १९६२ साली ते आचरा हायस्कूल मध्ये क्रीडाशिक्षक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी खेळाबरोबर भूगोल, कार्यानुभव विषयांचे अध्यापन केले. व्हॉलीबॉल , क्रिकेट, कबड्डी, खो‌ – खो अशा मैदानी खेळात विद्यार्थी घडवून जिल्हा राज्य स्तरावर चमकवले होते. १९९९ साली ते आचरा हायस्कूल मधून ते निवृत्त झाले. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.

आचरा येथील ठेकेदार गणेश गोवेकर व व्यावसायिक हेमंत गोवेकर यांचे ते वडिल होत. दिवंगत ज्येष्ठ क्रीडा शिक्षक रमेश गोवेकर यांच्या निधनानंतर शोक व्यक्त होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आचरा | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील आचरा समर्थनगर येथील निवासी तसेच आचरा हायस्कूलचे माजी क्रीडाशिक्षक रमेश घनःश्याम गोवेकर ( वय ८४ वर्षे) यांचे शुक्रवारी, ४ ऑक्टोबर रोजी पहाटे निधन झाले. राज्य स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धेत अनेक विद्यार्थी घडवत त्यांनी नावारुपाला आणले होते. कडक शिस्तीचे आणि प्रेमळ, उत्साही, हसतमुख व क्रियाशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. १९६२ साली ते आचरा हायस्कूल मध्ये क्रीडाशिक्षक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी खेळाबरोबर भूगोल, कार्यानुभव विषयांचे अध्यापन केले. व्हॉलीबॉल , क्रिकेट, कबड्डी, खो‌ - खो अशा मैदानी खेळात विद्यार्थी घडवून जिल्हा राज्य स्तरावर चमकवले होते. १९९९ साली ते आचरा हायस्कूल मधून ते निवृत्त झाले. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.

आचरा येथील ठेकेदार गणेश गोवेकर व व्यावसायिक हेमंत गोवेकर यांचे ते वडिल होत. दिवंगत ज्येष्ठ क्रीडा शिक्षक रमेश गोवेकर यांच्या निधनानंतर शोक व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!