मालवण | प्रतिनिधी : अध्यापक मंडळ सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत ओझर विद्यामंदिर, कांदळगांव प्रशालेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेत इयत्ता आठवीतील कु. तृप्ती परुळेकर, कु केदार चव्हाण, कु. विघ्नेश कुंभार, कु. रिद्धी कदम, कु अमृता बागवे, कु. ओमकार राणे, कु हर्षाली लाड, कु स्वप्नाली सुर्वे आणि कु भक्ती तेली असे एकूण नऊ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी पाच विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी तर दोन विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. या सर्व विद्यार्थ्यांना ओझर विद्यामंदिरचे गणित विषयाचे शिक्षक पी. के. राण यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल, मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समितीचे अध्यक्ष श्री शेखर अर्जुन राणे, सचिव जी एस परब, खजिनदार शरद परब व सर्व संस्था चालक, शालेय समितीचे अध्यक्ष श्री किशोर नरे व सर्व सदस्य तसेच ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री. डि. डि जाधव आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.