23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

तुमच्या हक्काचं तुम्हाला मिळवून देणे हा जाणीव जागर यात्रेचा आमचा उद्देश : सौ. अर्चना घारे – परब.

- Advertisement -
- Advertisement -

जाणीव जागर यात्रेला रोणापालमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद.

बांदा | राकेश परब : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल गावात जाणीव जागर यात्रा पोहचली. ग्रामस्थांनी यात्रेमधील सहभागी कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे – परब यांचे स्वागत केले. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रोणापाल गावात यात्रेला मिळाला. यावेळी रोणापाल गावचे माजी सरपंच प्रकाश गावडे, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर नेमण, अशोक कुबल, सुदिन गावडे, उमेश तुयेकर, संतोष कोळापटे, बाबल तुयेकर, सचिन कुबल, निलेश नाईक,प्रदिप नाईक उपस्थित होते.

यावेळी या यात्रेमध्ये बोलताना कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चनाताई घारे-परब म्हणाल्या आमच्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवण्याच काम गेली अनेक वर्षे झालेल आहे. त्यामुळे आमच्या जे हक्काचं आहे ते आम्हाला प्राप्त झाले पाहिजे असे प्रतिपादन कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे – परब यांनी जाणीव जागर यात्रेवेळी मार्गदर्शन करताना केले.

सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल गावातील महिला, युवक, ज्येष्ठांकडून यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ग्रामस्थांनी आरोग्य, रोजगार, याबाबत व्यथा मांडल्या‌. महिला वर्गाने देखील मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. यावेळी महिलांनी आपल्या समस्या सौ. अर्चना घारे-परब यांच्यासमोर मांडला. यावेळी सौ. घारे यांनी, उपस्थितांना मूलभूत हक्कांची जाणीव करून दिली. असंख्य समस्या आपल्यापुढे आहेत. आपल्याला हक्काच्या या गोष्टींपासून वंचित राहावे लागत आहे. हे सगळे आपले मुलभूत हक्क असून हक्काच आहे ते प्राप्त झालेच पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही ही आपल्याला दिलेली शक्ती असून त्यात मोठी ताकद आहे. त्या शक्तीची, त्या ताकदीची जाण ठेवा, ती ताकद स्मरणात ठेवा. तुमच्या हक्काचं तुम्हाला प्राप्त करून देणे हाच आपला उद्देश आहे असे प्रतिपादन सौ. अर्चना घारे यांनी यावेळी केले. याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री. पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष श्री. देवेंद्र टेमकर, युवती महीला जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सावंतवाडी विधानसभा युवती अध्यक्षा सौ.सुनिता भाईप, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष श्री. संजय भाईप,विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस, विद्यार्थी अध्यक्ष कु. हृतिक परब, जुहुर खान, याकूब शेख, सिद्धेश तेंडोलकर, बावतीस फर्नांडिस, साईनाथ तानावडे, संजय तानावडे, राजन परब, नामदेव परब, आनंद गावडे, साईनाथ गावडे, तेजस गांवकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते यात्रेला उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

जाणीव जागर यात्रेला रोणापालमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद.

बांदा | राकेश परब : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल गावात जाणीव जागर यात्रा पोहचली. ग्रामस्थांनी यात्रेमधील सहभागी कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे - परब यांचे स्वागत केले. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रोणापाल गावात यात्रेला मिळाला. यावेळी रोणापाल गावचे माजी सरपंच प्रकाश गावडे, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर नेमण, अशोक कुबल, सुदिन गावडे, उमेश तुयेकर, संतोष कोळापटे, बाबल तुयेकर, सचिन कुबल, निलेश नाईक,प्रदिप नाईक उपस्थित होते.

यावेळी या यात्रेमध्ये बोलताना कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चनाताई घारे-परब म्हणाल्या आमच्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवण्याच काम गेली अनेक वर्षे झालेल आहे. त्यामुळे आमच्या जे हक्काचं आहे ते आम्हाला प्राप्त झाले पाहिजे असे प्रतिपादन कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे - परब यांनी जाणीव जागर यात्रेवेळी मार्गदर्शन करताना केले.

सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल गावातील महिला, युवक, ज्येष्ठांकडून यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ग्रामस्थांनी आरोग्य, रोजगार, याबाबत व्यथा मांडल्या‌. महिला वर्गाने देखील मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. यावेळी महिलांनी आपल्या समस्या सौ. अर्चना घारे-परब यांच्यासमोर मांडला. यावेळी सौ. घारे यांनी, उपस्थितांना मूलभूत हक्कांची जाणीव करून दिली. असंख्य समस्या आपल्यापुढे आहेत. आपल्याला हक्काच्या या गोष्टींपासून वंचित राहावे लागत आहे. हे सगळे आपले मुलभूत हक्क असून हक्काच आहे ते प्राप्त झालेच पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही ही आपल्याला दिलेली शक्ती असून त्यात मोठी ताकद आहे. त्या शक्तीची, त्या ताकदीची जाण ठेवा, ती ताकद स्मरणात ठेवा. तुमच्या हक्काचं तुम्हाला प्राप्त करून देणे हाच आपला उद्देश आहे असे प्रतिपादन सौ. अर्चना घारे यांनी यावेळी केले. याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री. पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष श्री. देवेंद्र टेमकर, युवती महीला जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सावंतवाडी विधानसभा युवती अध्यक्षा सौ.सुनिता भाईप, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष श्री. संजय भाईप,विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस, विद्यार्थी अध्यक्ष कु. हृतिक परब, जुहुर खान, याकूब शेख, सिद्धेश तेंडोलकर, बावतीस फर्नांडिस, साईनाथ तानावडे, संजय तानावडे, राजन परब, नामदेव परब, आनंद गावडे, साईनाथ गावडे, तेजस गांवकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते यात्रेला उपस्थित होते.

error: Content is protected !!