मालवण | प्रतिनिधी : तारकर्लीचे समाजसेवक सुरेश बापार्डेकर यांनी एस टी वरिष्ठ प्रशासन मुंबई यांच्यावर अनास्थेचा आरोप करत एस टी प्रशासनाला निवेदन दिले आहे. मालवण आगाराला चार मिनी बस आणि मोठ्या सहा एस टी गाड्या येत्या दिवाळी पूर्वी मागवून द्याव्यात अन्यथा मालवण आगार समोर आमरण २५ ऑक्टोंबर २०२४ ला उपोषणाला बसणार असल्याचे लेखी निवेदन, २९ सप्टेंबर रोजी तारकर्लीचे समाजसेवक सुरेश बापर्डेकर यांनी एस टी आगार व्यवस्थापक सूर्यवंशी यांनी दिले. तारकर्ली व देवबाग साठी मिनी बस करिता एकनाथजी शिंदे ( मुख्यमंत्री( आणि देवेंद्र फडणवीस ( उपमुख्यमंत्री) यांना १८ जाने २०२३ यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी अहवाल मागितला तो शासनाकडे महाव्यवस्थापक कार्यालयातून मंजुरीला पाठविला गेला. तो प्रस्ताव मंजुर येऊनही प्रशासन खरेदी अगर भाडे तत्वावर घेत नसल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला आहे असे बापार्डेकर यांनी स्पष्ट केले आहे. मालवण तालुक्यातील पर्यटन दृष्टया विकसित तारकर्ली गावी पर्यटक असल्याने गावात गाड्यांची आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ नेहमीच चालू असते अशावेळी वाहतुकीची कोंडी होत असल्याने पूर्वी या मार्गावर दोन मिनी चालू होत्या. पण कोरोना काळात त्या बंद ठेवल्याने खराब झाल्याने मोठी बस पूर्ण देवबाग पर्यंत पोहोचत नाहीत. काही बसेस मध्येच तारकर्ली येथे वळवून परत फिरतात किंवा अचानक फेऱ्या बंद कराव्या लागतात. अशावेळी गावातील प्रवासी, नागरिक तसेच गावातील विद्यार्थी शाळा आणि कॉलेज इतर कोर्सेस याकरिता प्रवाशी आणि नागरिक मालवणला इतर गावांनी ये जा करीत असतात त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. यापूर्वी या मार्गावर मिनी बस मालवण हून तर दुसरी देवबाग हून सोडली जात होत्या. तरी जर नवीन मिनी बस आल्यास मुलांच्या सोयीकरिता मालवण आगारातून सकाळी व सायंकाळी चार फेऱ्या मुलांच्या वेळेनुसार बाजारपेठ मार्गे सोडल्या तर सर्वांची होणारी गैरसोय दूर होईल असे सांगत मिनी बसायची मागणी तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी केली.
सुरेश बापर्डेकर म्हणाले की महाव्यवस्थापक आणि वरिष्ठ प्रशासन यांच्या निष्काळजी कामामुळे मालवण आगार समोर उपोषणाला बसावे लागत आहे. मालवण आगारातुन ये जा करणारे फे-या काही प्रवासी तारकर्ली व काही देवबागसाठी आहेत परंतु त्या अपु-या आहेत. आणखी चार मिनी बस मिळाल्या तर या तारकर्लीच्या आजुबाजुच्या गावातील भूतनाथ, देवली, दत्तमंदिर, वायरी, काळेथर, तारकर्ली आणि विठ्ठल मंदिर देवबाग पर्यतच्या प्रवासी व शाळेतील मुलांना सकाळी गावातुन मालवणला शाळेत जाताना उपयुक्त ठरतील. मालवणहून गावाकडे जर एस. टी च्या फेऱ्या पूर्वी प्रमाणे देवबाग आणि तारकर्ली येथून मालवण आणि मालवणहून तारकर्ली व देवबाग अशा मिनी बसेस सोडल्या तर नक्कीच जाता येता सर्व प्रवाशांना ताटकळत उन पाऊस झेलत रहायला नको. या फेऱ्या बाजारपेठ मार्गे ये-जा करत असतील तर प्रवाशांबरोबर, शाळा कॉलेज करिता ये-जा करणा-यांना या फे-यांमुळे शाळा कॉलेजातील मुले आणि प्रवाशी यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. यामुळे एस टी महामंडळाला उत्पन्नात देखिल मोठ्या प्रमाणात वाढ होईल असे बापार्डेकर यांनी सांगितले.
सध्या मालवण आगारातून मोठी बस सोडली जाते परंतु कित्येक वेळा काही वेळा रस्ता अरुंद आणि पर्यटक गाड्या यामुळे बस प्रवाशी ,विद्यार्थी असताना देखील एस टी सोडली जात नाही. ऐन मोसमात मिनी बस नसल्याने या मार्गावर पर्यटकांची आणि गाड्यांची वर्दळ वाढली यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपुऱ्या बसेस ये जा कराव्या लागतात आणि प्रवाशी विद्यार्थी यांना मनस्ताप होतो. त्यात मोठ्या बसेसच्या रुट फेऱ्यां पेक्षा गाड्यांची कमतरता आहे असे वारंवार वाहतूक कंट्रोल रुमकडून सांगितले जाते यावर सामान्य प्रवासी वर्गाने काय करायचे असा सवाल देखिल बापार्डेकर यांनी केला आहे.
श्री सुरेश बापर्डेकर यांनी पुढे म्हणाले की मालवण आगाराला रुट जादा आहेत. बसेस कमी आहेत . तरी आपण त्वरित वरिष्ठांच्या पत्रानुसार त्वरित मीटिंग घेऊन त्यात विषय मांडून लवकरात लवकर मालवण आगाराला चार सुस्थितीतील मिनी बस आणि सहा मोठ्या गाड्या खरेदी करून मिळाव्यात जेणेकरून इतर गावातील आणि तारकर्ली देवबाग येथील प्रवाशी नागरिक विद्यार्थी यांचे होणारी गैरसोय दूर होईल. तरी संबधित परिवहन मंत्रालय जवळ मंजुरी करिता पाठविलेली फाईल मंजुरी होऊन आलेली असताना सुद्धा मा. महाव्यवस्थापक, उपाध्यक्ष एस टी परिवहन महामंडळ मुंबई यांच्या कडून विलंब होत आहे. तसेच संबधित उपमुख्यमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री यांच्याकडून मागितलेल्या १२५० मिनी बस नवीन खरेदी अगर भाडेतत्वावर घेण्यास अनुमती मिळाली असताना देखील वेळकाढू आणि आम्हाला प्रवाशांची गैरसोय झाली तरी चालेल पण बस आणायचेच नाही असे दिसून येते आहे असा आरोप ब बापार्डेकर यांनी केला आहे.
निवेदन पत्र मिळाल्यापासून दिवाळी पूर्वी चार मिनी बस आणि सहा मोठ्या गाड्या मालवण आगाराला दिनांक २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत मिळाल्या नाहीत तर एस टी वरीष्ठ प्रशासन मुंबई यांच्या विरुद्ध मी स्वतः, ग्रामस्थ, विद्यार्थी दिनांक २५ ऑक्टोंबर २०२४ रोजी मालवण आगार समोर आमरण उपोषणाला बसणार आहे याची कल्पना मां. महाव्यवस्थापक वाहतूक मुंबई,विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांना फॅक्स द्वारे आणि श्री अनिरुद्ध सुर्यवंशी आगार व्यवस्थापक मालवण यांना प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले असे यावेळी सुरेश बापर्डेकरयौ यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळवले आहे. त्यांच्या समवेत देवबाग तारकर्लीचे रामचंद्र चोपडेकर ,किशोर कुबल बबन मांजरेकर हे निवेदन देताना उपस्थित होते.