मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या कृ सि देसाई शिक्षण मंडळाच्या स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा हीरक महोत्सव व पर्यटन सप्ताहाचा उद्घाटन सोहळा २७ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. लोककला व पर्यटन अशी संकल्पना असलेल्या या सोहळ्याचे आयोजन स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष तथा IQSC, महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स आणि युवा टुरीझम येंच्यावतीने करण्यात आले.
मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक श्री संतोष जिरगे व उद्घाटक मान्यवरांनी या पर्यटन व लोककला महोत्सवाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन केले. या नंतर मंचावरील मान्यवरांनी श्री देवी सरस्वतीला पुष्पहार अर्पण केला. महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डाॅ. उज्वला सामंत व डाॅ. सुमेधा नाईक यांनी मंचावरील उद्घाटक मान्यवर मान्यवर प्रमुख अतिथी मुख्याधिकारी व प्रशासक श्री संतोष जिरगे, कृ सी देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, संस्थेचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सच्या पर्यटन विभागाचे माजी अध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगरसेवक व संस्थेचे सचिव श्री चंद्रशेखर उर्फ गणेश कुशे, संस्था सदस्य डाॅ. शशिकांत झांटये, श्री साईनाथ चव्हाण, भाऊ सामंत, उद्योजक नितीन वाळके, साॅफ्ट लॅबचे मिथिलेश बांदिवडेकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुधीर धरी, संदिप कोयंडे उपस्थितांचे स्वागत केले. मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
प्रा डाॅ उज्वला सामंत यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात, स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विविध पैलूंचा स्थापनेपासूनचा थोडक्यात आढावा घेतला. महाविद्यालयातील पर्यटन महोत्सवाचे हे चौथे वर्ष असून यंदा पर्यटनासोबत लोककला ही संकल्पना यासाठी महाविद्यालयाच्या भूमिकेची त्यांनी माहिती दिली. या नंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ शिवराम ठाकुर यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रम आणि त्याला जोडले गेलेल्या संस्थाचालक व आजी माजी विद्यार्थ्यांच्या योगदानाची विशेष माहिती दिली पर्यटन महोत्सव आयोजीत करुन विद्यार्थी वर्गाला थेट समाजापर्यंत जोडणारे हे राज्यातील पहिलेच महाविद्यालय आहे याचा आनंद आहे असे सांगितले.
यानंतर प्रमुख अतिथी तथा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक श्री संतोष जिरगे यांनी सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या हीरकमहोत्सव निमित्त संस्थेचे अभिनंदन केले आणि हे महाविद्यालय जितके ज्येष्ठ होतंय तितकेच त्यातील उपक्रमांमुळे ते आणखीन चैतन्यमय होत आहे असे सांगितले. महाविद्यालयाच्या शतक महोत्सवाला आपल्याला यायला आवडेल अशा त्यांनी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सचे सदस्य श्री विजय केनवडेकर यांनी त्यांच्या मनोगतात पर्यटनाची व्यवसायिक दिशा याबाबत मार्गदर्शन केले. आपले स्थानिक ज्ञान, वाणी व सेवा यांचा मेळ घालून अतिशय कमी भांडवलामध्ये पर्यटन व्यवसाय यशस्वीपणे साध्य करता येतो असे त्यांनो प्रतिपादन केले. संस्था सदस्य डाॅ शशिकांत झांटये यांनी पर्यटनाला अत्यावश्यक दळणवळण व स्वच्छता यांवर प्रकाश टाकताना आपल्याकडे जे कमी आहे त्याचा सर्व स्तरावर पाठपुरावा करावा असे आवाहन केले. आपल्याकडच्या समृद्धिचे प्रदर्शन केले तर पर्यटनाला चालना मिळेल असेही त्यांनी सांगितले. साॅफ्ट लॅब्जचे मिथिलेश बांदिवडेकर यांनी पर्यटनाला इंटरनेट व माहिती तंत्रज्ञान यांची सांगड घालून ते वृद्धींगत कसे करता येईल त्याबद्दल डिजीटल प्रात्यक्षिकासह माहिती दिली.
या महोत्सवाची संकल्पना लोककला असल्याचे औचित्य साधून आयोजकांनी लोककलावंत भजनबुवा श्री भालचंद्र बुवा केळुसकर, महिला कीर्तनकार सौ. मेधा शेवडे, सिंधुफुगडी मंडळाच्या सौ. मृणाली चव्हाण व विजयदुर्गचे लोकगीतकार श्री ज्ञानेश्वर बांदकर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक लोककलावंतांचा सत्कार केला. यावेळी लोककलावंतांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना पर्यटन व लोककलेची महती सांगितली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. खरात यांनी केले आणि प्रा डाॅ सुमेधा नाईक यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाला मुख्याधिकारी व प्रशासक श्री संतोष जिरगे, कृ सि देसाई शिक्षण मंडळ मालवण यांचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सच्या गवर्निंग कौन्सिलचे सदस्य विजय केनवडेकर, डाॅ शशिकांत झांटये, साईनाथ चव्हाण, मिथिलेश बांदिवडेकर व टीम, नितीन वाळके, नितीन तायशेट्ये, भाऊ सामंत, सुधीर धुरी, संदीप कोयंडे, भालचंद्र केळुसकर, मेधा शेवडे, रुणाली चव्हाण, ज्ञानेश्वर बांदकर, लेफ्टनंट कर्नल प्रा. खोत, संतोष लुडबे, हरीश उर्फ दादा वेंगुर्लेकर, डाॅ. राहुल पंतवालावलकर, फॅनी फर्नांडिस, सुहास ओरसकर, उमेश सांगोडकर, आप्पा चव्हाण, समाजसेविका शिल्पा यतीन खोत, पल्लवी तारी – खानोलकर, शांती तोंडवळकर, उच्च श्रेणी मुख्याध्यापिका अर्चना कोदे, अमेय देसाई, प्रा हसन ख़ान, चिन्मय परब, दर्शन वेंगुर्लेकर आणि पर्यटन व्यवसायिक, पर्यटन मार्गदर्शक, अभ्यासक, स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा प्राध्यापकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.