मळगांव | नितिन गावडे : सावंतवाडी तालुक्यातल्या न्हावेली येथील शाळा नंबर ४ येथे एका तीव्र वळणावर स्वखर्चाने युवा समाजिक कार्यकर्त्यांनी बहिर्वक भिंग आरसा बसवला. यासाठी न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर, नितीन चव्हाण, प्रथमेश नाईक, राज धवन , धनेश नाईक, भूषण पार्सेकर, सुदन पार्सेकर, दीपक बरकुटे, अजय पार्सेकर, वासुदेव पार्सेकर , चेतन पार्सेकर, सुजित नेमण, प्रितेश परब, ओम पार्सेकर, अमोल पार्सेकर, तुकाराम पार्सेकर, ॲंडी नाईक, सावळाराम न्हावेलकर या तरुणांनी एकत्र येत स्वखर्चाने योगदान दिले
यावेळी युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर युवा सामाजिक कार्यकर्ते ओम पार्सेकर, समिर पार्सेकर, सिद्धेश पार्सेकर, तुळशीदास पार्सेकर, सगुण नाईक, रूपेश नाईक , प्रथमेश नाईक, विकास मांजरेकर , सिद्देश धवण, किशोर नाईक, श्याम नाईक उपस्थित होते.
या तीव्र वळणावरील अपघात टाळण्यासाठी ही उपाययोजना उपयुक्त ठरेल याचे समाधान आहे अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व वाहनचालकांनी दिली.