सिंधुदुर्ग | नितिन गावडे : आमची पश्चिम रेल्वे मुंबई या प्रवासी संघटनेने नुकतेच, पश्चिम रेल्वेच्या डिआरएम यांच्या कार्यालयात जात विविध मागण्यांचे निवेदन दिले.या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की दिवसेंदिवस मुंबई लोकलमधील गर्दी वाढत असल्याने प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाला काही पर्याय सुचवले आहेत, यामध्ये मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून देशाच्या एकूण करांपैकी २५% कर हा फक्त मुंबई शहर भरते तरीही दरदिवसाला मुंबई लोकल मधून पडून ५ ते ६ प्रवाशांचा बळी जातोय त्यामुळे सर्व लोकल सेफ्टी डोअरच्या चालवाव्यात, मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे व हार्बर लाईन वर प्रवाशांच्या तुलनेत लोकल चालवण्यासाठी भुयारी मार्गाचा पावर करावा. ( उदा. बुलेट ट्रेन ) किंवा रेल्वे ब्रिज डबलिंगचा ( उदा. मेट्रो ) सारखा वापर करावा म्हणजे खालून जलद लोकल, मेल, एक्सप्रेस तर ब्रिजवरून स्लो लोकल चालवल्या जातील. यामुळे भविष्यात प्रवाशांच्या तुलनेत मुंबई लोकल चालवता येतील.
मुंबई आणि उपनगरांच्या दक्षिणेकडे मोठया प्रमाणात इंडस्ट्रीज तर उत्तरेच्या बाजूला मोठी रेसिडेंसी असल्याने मुंबई लोकलचा समतोल बिघडतोय म्हणून सकाळी मुंबईच्या दिशेने तर संध्याकाळी मुंबईच्या बाहेर जाताना मोठी गर्दी दिसतेय, यासाठी पालघर, बोईसर, वसई, वाडा, भिवंडी, कल्याण, कर्जत व नवी मुंबई ह्या परिसरात मोठया इंडस्ट्रिज आहेत म्हणून येथे ट्रान्सपोर्ट हब बनवून येथे लोकल व मेट्रोचे प्रमाण वाढवल्यास सकाळी व संध्याकाळी अप आणि डाऊन मार्गावरील मुंबई लोकलच्या गर्दीवर नियंत्रण मिळवता येईल पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वेच्या मुंबई लोकलचे स्वतंत्र्य झोन बनवावे,पश्चिम रेल्वे वरील गर्दी कमी करण्यासाठी सर्व लोकल १५ डब्यांच्या चालवाव्यात.
पश्चिम रेल्वेच्या नेहमीच्या लोकल रद्द करून त्या ठिकाणी एसी लोकल सुरू करू नयेत त्यासाठी नवीन वेळापत्रक बनवावे सर्वसामान्यांना एसी लोकल परवडत नसल्याने फक्त ३०% प्रवासीच त्यातून प्रवास करतात परिणामी त्याचा मागील लोकल वर भार येऊन प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो लटकून प्रवास केल्याने लोकल अपघातांचे प्रमाणही वाढलेले आहे. मुंबईच्या तिन्ही मार्गावरील एसी लोकलचा तिकीट दर कमी करावा विरार ते चर्चगेट दरम्यान एसी लोकलचा मासिक पास २२०० रू.आहे १२ ते १५ हजारावर काम करणाऱ्या मुंबईकरानी हे पैसे खूप जास्त आहेत यासाठी १) सामान्य लोकल वाढवा किंवा ते शक्य नसल्यास २) त्या सर्व स्क्रॅप करून त्याबदल्यात सेफ्टी डोअरच्या एसी किंवा नॉनएसी लोकल सरसकट सेकंड क्लासच्या तिकीट दरांमध्ये चालवाव्यात किंवा ३) एसी चे तीन कोच सामान्य लोकलला जोडावेत, त्याच्याने जनरल,फर्स्ट क्लास व एसी एकत्रच धावतील.
नालासोपारा हे पश्चिम रेल्वेवरील सर्वात जास्त लोकवस्तीचे स्टेशन आहे सकाळी कामाच्या वेळी विरारला रिटर्न जाऊन वेळ फुकट जात असल्याने ७ ते १० या वेळेत प्रत्येक २० मिनिटांनी यशवंतनगर यार्ड मधून फ्रेश लोकल प्लॅटफॉर्म नंबर २ वरून नालासोपारा ते चर्चगेट /दादर /अंधेरी अशा लोकल सुरू कराव्यात. पश्चिम रेल्वेच्या विरार चर्चगेट लोकलमध्ये नालासोपारावाले रिटर्न येऊन प्रवास करत असल्याने सकाळी ६.३० ते १० या वेळेत विरारला येणाऱ्या फास्ट ट्रॅक वरील सर्व लोकल नालासोपारा प्लॅटफॉर्म नंबर ३ वर न थांबवता त्या थेट वसई वरून विरारला आणाव्यात व नालासोपारा प्लॅटफॉर्म नंबर १ वरील सर्व लोकल नेहमीप्रमाणे थांबवाव्यात,विरार लोकल असूनही विरारकरांना अंधेरी बांद्रापर्यंत बसायलाच मिळत नाही ( उदा. संध्याकाळी सर्व फास्ट लोकल मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्याने थांबत नाहीत त्याप्रमाणे सकाळी नालासोपाऱ्याला करावे ).
सकाळी ७ ते १० या गर्दीच्या वेळेत प्रत्येक २० मिनिटांनी विरारच्या नारंगी रोड व यशवंत नगर यार्ड येथील यार्ड मधून प्लॅटफॉर्म ६ व १ वरून विरार ते चर्चगेट /दादर / अंधेरी अशा फास्ट लोकल सुरू कराव्यात.
विरार अंधेरी लोकल संदर्भात, सकाळी गर्दीच्या वेळी विरार चर्चगेट लोकल ह्या अंधेरीला ३०% खाली होतात त्यामुळे सकाळी ७ ते १० व सायं. ६ ते १० या वेळेत विरार अंधेरी दरम्यान प्रत्येक २० मिनिटांनी जलद लोकल चालवाव्यात, संध्याकाळी गर्दीच्या वेळी ७.२५ ते ८.१३ दरम्यान २ अंधेरी विरार लोकल सुरू कराव्यात मधील ५० मिनिट अंधेरी विरार लोकलच नाही आहेत.
इतर महत्वाच्या मागण्यांमधाये पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल टर्मिनस येथील लीज संपल्याच्या कारणांनी विरारच्या यशवंतनगर यार्डची निर्मिती करण्यात आली. रेल्वेने त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीही खर्च केला मात्र हे यार्ड नेहमी रात्रीच्या वेळी खाली असल्याचे निदर्शनास येत आहे,येथे स्टेला लोकलच नसतात,असे का? असा सवाल प्रवासी संघटनेने केला आहे.
विरार चर्चगेट विरार सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी लेडीज स्पेशल लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात,गर्दीच्या वेळी मुंबई लोकलमध्ये जेष्ठ नागरिकांना त्यांच्या सीट पर्यंत पोहोचताच येत नाही त्यासाठी त्यांना स्वतंत्र बोगी मिळावी. काही मुंबई लोकलमध्ये सेकंड क्लासच्या डब्यातील बसण्याच्या सिटस अत्यंत वाईट आहे त्यावर प्रवाशांना १० मिनिटे बसताच येत नाही.
पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकात काही बदल करावेत. यामध्ये सकाळी ७ ते ९ व संध्याकाळी ६ ते १० यावेळी डहाणू रोड ते वसई रोड अशा प्रत्येक २० मिनिटांनी लोकल सुरू कराव्यात.रात्री ११ नंतरच्या बऱ्याच लोकल भाईंदरच्या यार्डमध्ये येत असल्याचे निदर्शनास येत आहे, त्यातील काही लोकल विरारच्या यार्ड मध्ये आणाव्यात. व विरारला सर्व एसी लोकल प्लॅटफॉर्म नंबर १ वरूनच चालवाव्यात.पहाटे ३ वाजून ३० मि.पासून चर्चगेट विरार लोकल सुरू कराव्यात. दिवसभरात चर्चगेट बोरीवली फास्ट लोकलच्या काही फेऱ्या रद्द करून त्या ठिकाणी डहाणू रोडच्या लोकल फेऱ्या वाढवाव्यात.पहाटे ५.८ मिनिटांची नालासोपारा बांद्रे लोकल विरार वरून सुरू करावी.
रात्री ११.१२ मिनिटांची अंधेरी नालासोपारा लोकल अंधेरी विरार करावी.डहाणू रोड / बोईसर ते विरार लोकल सायंकाळी ७ च्या दरम्यान सुरू करावी.सकाळी ७.१८ मि.विरार दादर फास्ट लोकलला नालासोपाऱ्याला थांबा देऊन ती विरार चर्चगेट अशी चालवावी.
चर्चगेट विरार सायंकाळी ६.२२ मिनिटांची एसी फास्ट लोकल सामान्य लोकल म्हणून चालवावी. सकाळच्या ७.१९ आणि ८.२४ मिनिटांची विरार बोरीवली १५ डब्यांच्या स्लो लोकल अंधेरी पर्यंत चालवाव्यात. तर पुढे सकाळी ८ ते ९ दरम्याने ४ अंधेरी चर्चगेट स्लो लोकल आहेत त्यातील काही कमी कराव्यात.सायं. ६.५१ ते ८.४४ यांच्यामध्ये १ तास ५३ मिनिटात चर्चगेट विरार स्लो लोकल नाही आहेत तर दरम्यानच्या काळात ४ चर्चगेट ते विरार / भाईंदर स्लो लोकल चालवाव्यात. सायंकाळी ६ नंतर प्रत्येक अर्ध्या तासाने दादर ते विरार लोकल चालवाव्यात. सकाळी ७ ते १० व सायंकाळी ६ ते १० दरम्यान विरार चर्चगेट विरार काही लोकल डबल फास्ट कराव्यात तर काहीना अल्टरनेट थांबे द्यावेत. डहाणू दिवा ते पनवेल मेमू प्रत्येक तासाला सोडावी किंवा त्या मार्गावर लोकल सुरू कराव्यात अश्या विविध मागण्या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर अध्यक्ष श्री.अनिल मोरे व सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी सह्या केल्या असून त्याच्या प्रति रेल्वेमंत्री,राज्याचे मुंख्यमंत्री, जनरल मॅनेजर पश्चिम रेल्वे, मुंबईचे खासदार श्री. पियुष गोयल, श्री. हेमंत सावरा, श्री. अरविंद सावंत, सौ. वर्षा गायकवाड व स्टेशन मास्तर विरार,नालासोपारा व वसई रोड यांना देण्यात आल्या आहेत.