शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील साळशी येथील माध्यमिक विद्यामंदिर साळशी प्रशालेच्या ‘सखी सावित्री समिती’ च्या अध्यक्षपदी प्रशालेचे स्कूल कमिटी चेअरमन तथा चाफेड गांवचे माजी सरपंच सत्यवान सूर्यकांत भोगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला – मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावरून विविध स्तरावर ‘सखी सावित्री समिती’ चे गठन करण्यात आले आहे.
या समितीची नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष सत्यवान सूर्यकांत भोगले ( शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ), सदस्य – माणिक शंकर वंजारे ( मुख्याध्यापक ), संजय गणेश मराठे ( समुपदेशक ), छाया अरविंद बागवे, ( आरोग्यसेविका ), सौ. प्रतीक्षा चंद्रकांत शिवलकर ( अंगणवाडी सेविका ), सौ. कामिनी किशोर नाईक ( पोलीस पाटील ), सौ. पूनम दिनेश मणचेकर ( ग्रामपंचायत सदस्य महिला प्रतिनिधी ), सौ. प्राजक्ता पंढरीनाथ परब ( पालक महिला प्रतिनिधी ), विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. केतकी रवींद्र साळसकर ( ई. १० वी. ), कु. पूर्वा संजय लाड ( इ. ९ वी. ), कु. मिथुन दिनेश मणचेकर ( ई. ८ वी. ), कु. यज्ञेश कुलदीपक घाडीगावकर ( ई. १० वी. ) यांची निवड करण्यात आली आहे.