डबलबारीच्या नामवंत बुवांचे भजन सादरीकरण.
मालवण | प्रतिनिधी : मालवण बाजारपेठेतील श्री संतसेना महाराज मार्गावरील श्री भैरवी देवालयातील भजन महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. याचा शुभारंभ नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी ३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता होणार आहे. सलगपणे दहा दिवस भजनसेवा जिल्हयातील नामवंत डबलबारी भजनाच्या बुवांकडून करण्यात येणार आहे. दसरा म्हणजे १२ ऑक्टोबर रोजी वा सोहळ्याचा समारोप होणार आहे, अशी माहिती श्री भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळाचे अध्यक्ष अंकुश चव्हाण व नाभिक समाजाचे नेते विजय शिवा चव्हाण यांनी दिली.
या उत्सवाचे पहिले पुष्प ३ रोजी स्वरशक्ती साधना मजन मंडळाचे बुवा कृष्णा कदम हे गुंफणार आहेत. ४ रोजी ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ (बुवा प्रदीप सामंत), ५ रोजी भद्रकाली प्रासादिक भजन मंडळ (बुवा सिद्धेश कांबळी), ६ रोजी विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ (बुवा अक्षय परुळेकर), ७ रोजी गोपाळकृष्ण प्रासादिक भजन मंडळ श्रावण गवळीवाडी (बुवा संजय चव्हाण), ८ रोजी आकारी ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ (बुवा चेतन घुरी), ९ रोजी देवकीमाता प्रासादिक भजन मंडळ (बुवा सिद्धेश पाताडे), १० रोजी अष्टपैलू कलानिकेतन भजन मंडळ (बुवा सुनील परुळेकर), ११ रोजी ब्राह्मणदेव प्रासादिकभजन मंडळ कातवड (बुवा मंगेश नलावडे), १२ रोजी वडचीदेवी प – सादिक भजन मंडळ लिंगडाळ देवगड (बुवा संदीप लोके) यांची भजने सादर होणार आहेत.
या उत्सवात इतरही सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम श्री देवी भैरवी मंदिरात होणार आहेत. भाविकांनी आणि भजनी रसिकांनी या भजन महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.