वैभववाडी | प्रतिनिधी : शाळा व्यवस्थापन समिती पालक व शिक्षकांच्या सहकार्याने वैभववाडी शहरातील दत्त विद्यामंदिर वैभववाडी नंबर १ तालुका स्कूलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. जिल्ह्यासह तालुक्यात प्राथमिक शाळांमध्ये प्रथम सीसीटीव्ही बसवण्याचा मान दत्त विद्यामंदिर तालुका स्कूल वैभववाडी यांनी मिळवला. या उपक्रमाचे उद्घाटन गट शिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय शेळके, उपाध्यक्ष श्रेया धावले, केंद्रप्रमुख विजय केळकर, श्री जाधव सर, मुख्याध्यापक दिनकर केळकर, प्रशांत ढवण, रक्तमित्र संघटनेचे अध्यक्ष राजेश पडवळ, दर्शना सावंत, मनीषा साठे, पालक वर्ग, पाटील मॅडम जाधव अंगणवाडी सेविका निकम मॅडम आदी पालक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दत्त विद्या मंदिर वैभववाडी शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या साठी तालुक्यात प्रथम सीसीटीव्ही बसवून प्राथमिक शाळांमध्ये एक आदर्श निर्माण केला असे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगार मनोगत व्यक्त करताना बोललेले या उपक्रमाचा तालुका इतर प्राथमिक शाळांनी आदर्श घ्यावा असे आवाहन केले.