माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची जागतिक कृषी मंच ( WAF ) मंडळावर झाली आहे नियुक्ती.
मालवण | प्रतिनिधी : मानवता विकास परीषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची जागतिक कृषी मंच( WAF ) मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल विशेष अभिनंदन केले आहे.
श्री. श्रीकांत सावंत ( संस्थापक अध्यक्ष मानवता विकास परीषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद.)
याबद्दल बोलताना मानवता विकास परीषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत म्हणाले की जागतिक अन्न व कृषी क्षेत्रातील सुरेशजी प्रभू यांचा गाढा अभ्यास व योगदान आहे. कोकण तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला आकार येण्यासाठी त्यांची झालेली निवड ही अत्यंत मोलाची ठरेल. जागतीक कृषी मंच हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कृषी विकासाला चालना देत असतो म्हणून कृषी क्षेत्रातील तज्ञ, विचारवंत एकत्र येऊन व्यापार, रोजगार यांसाठी कोकणातील संधी वाढतील.
श्रीकांत सावंत यांनी, कृषी उत्पादकता सुधारणे, कृषी बाजार व गुंतवणूक यासाठी सुरेश प्रभू यांची नियुक्ती ही मानवता विकास परीषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेच्या सर्वांगीण विकास संकल्पनांसाठी पोषक असल्याचेही विशेष नमूद केले आहे.