बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्यावतीने आयोजीत मार्गदर्शन कार्यक्रमात सायबर पत्रकार व डिजीटल साक्षरता शिक्षक मुक्ता चैतन्य करणार मार्गदर्शन.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांच्यावतीने, रविवारी२९ सप्टेंबर रोजी ‘मुलांच्या मोबाईलचे करायचे काय’ या विषयावर सायबर मित्र संस्थापक तसेच सायबर पत्रकार आणि डिजिटल साक्षरता शिक्षक मुक्ता चैतन्य या मार्गदर्शन करणार आहेत. २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता हे विशेष मार्गदर्शन आयोजीत करण्यात आले असून मुलं, आई – वडिल, पालक, आजी आजोबा व शिक्षकांसाठीही हे मार्गदर्शन उपयुक्त ठरणार आहे असे बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवणच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या मार्गदर्शन कार्यक्रमात सायबर पालकत्व, स्क्रीन टाईम, कोरोना कालावधीनंतर मुलांमधील बदल अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त पालक, पाल्य, विद्यार्थी – विद्यार्थीनी, शिक्षक, ज्येष्ठ नागरीक यांनी उपस्थित रहायचे आवाहन बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर आणि कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर यांनी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने केले आहे.