गणेश भजनातून जमलेल्या निधीद्वारे सलग सहाव्या वर्षी गरजू कुटुंबाला केली मदत.
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील तारकर्ली गावातील बाळ गोपाळांनी समाजासमोर पुन्हा एकदा एक आदर्श प्रस्थापित केला आहे . तारकर्ली गावातील कु. रोहन नरेश कांदळगांवकर, कु. ईशान सदाशीव सागवेकर, कु. निनाद गणपत मोंडकर , कु. रिषभ श्रीधर खराडे , कु. हार्दिक सतिश टिकम, कु. वेदांत सदाशिव सागवेकर, कु. नैतिक धोंडी कांदळगांवकर , कु . रोहित बाळकृष्ण वरक, कु.भुवन नरेंद्र नागवेकर, कु. देवेश सीताराम पराडकर, कु. आर्यन चंद्रशेखर कुबल या बाळगोपाळांनी गणेश भजनातून जमा झालेला निधी श्री. अविनाश चंद्रकांत धुरत आणि श्री. बबन लोणे या आजारपणाने त्रस्त असलेल्या गरजू व्यक्तींना मदत म्हणुन दिला . त्यामुळे या कुटुंबाचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका झाला आहे.
सलग ६ वर्षे या बाळगोपाळांनी गावातील निराधार आणि गरजु व्यक्तींना आर्थिक मदत केली आहे. हे बाळगोपाळ गेली सहा वर्षे सातत्याने अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित असल्याने सध्या तारकर्ली पंचक्रोशीत ते आदराचा व प्रशंसेचा विषय ठरत आहेत.