मळगांव | नितीन गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या आंबोली ग्रामपंचायत येथे १८ सप्टेंबर रोजी मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. याचे उद्घाटन आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर यांच्या हस्ते व माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या शिबिरात बीपी, शुगर, इसीजी तसेच आवश्यक वाटल्यास लॅबला पाठविण्या करिता रक्त व लघवीचे नमुने जमा करणे व इतर आजार व रोग निदान करणे तसेच पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करणे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची माहिती देणे , आभा कार्ड काढण्यासाठी सहकार्य करणे इत्यादी बाबत मोफत सहकार्य व मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात आंबोलीत अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला. यात महिला वर्गाचा मोठा सहभाग होता. या वेळी राणी जानकीबाई साहेब वैध्यकीय संस्थेचे डॉ. पाटील व त्यांचे सहकारी डॉक्टर व आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, आंबोली ग्रामपंचायत सदस्य सौ छाया नार्वेकर, भाजपा आंबोली गाव अध्यक्ष रामचंद्र गावडे, आंबोली माजी उपसरपंच सौ नमिता राऊत, आंबोली हायस्कूल संचालक विजय परब, आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र निरीक्षक गावडे, आशा सेविका, महिला बचत गट, आंबोली ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.