शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या साळशी येथे महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यानच्या आयसीडीएस देवगड सिंधुदुर्ग शिरगांव बीट’, यांच्या संकल्पनेतून पर्यवेक्षिका पूजा सावंत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली साळशी गांवकरवाडी अंगणवाडी, साळशी देवणेवाडी अंगणवाडी, साळशी घाडीवाडी अंगणवाडी यांच्या संयुक्त कृती कार्यक्रमांतर्गत साळशीत पोषण आहार व संतुलीत आहार विषयक मार्गदर्शन संपन्न झाले.
१२ सप्टेंबर रोजी, गांवकरवाडी येथे श्री प्रकाश गावकर (सुभेदार) यांच्या निवासस्थानी गौरी विसर्जनाचे औचित्य साधून पोषण अभियान अंतर्गत पोषण प्रभात फेरी, पोषण प्रतिज्ञा, पोषण आरती, कुपोषणाबाबत घ्यावयाची काळजी, नवजात अर्भकाची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन पर्यवेक्षिका सावंत यांनी केले. आहारामध्ये पालेभाज्यांचे महत्व,व सकस आहाराबाबत मार्गदर्शन अंगणवाडी सेविका अस्मिता मेस्त्री यांनी केले तर संतुलित आहार याबाबत माहितीअंगणवाडी सेविका प्रतीक्षा शिवलकर यांनी दिली. या कार्यक्रमाला मदतनीस सुविधा किंजवडेकर, मदतनीस रसिका मिराशी, आशा स्वयंसेविका मिराशी, पालक सौ पूजा गावकर, प्रतिभा गावकर, वैभवी गावकर, विठ्ठल लाड,प्रांजल लाड,वैभवी लाड,सत्यवती लाड, गणेश लाड, प्रिया लाड, श्रेया लाड, प्रतीक्षा गांवकर, कार्तिकी गावकर, स्नेहलता गांवकर, लता गांवकर, सर्वेश गांवकर,मधुरा गांवकर, सीमा गांवकर, विक्रम लाडगांवकर, शिल्पा लाडगांवकर, अर्णव लाडगांवकर, हर्षल लाडगांवकर, शिल्पा लाडगांवकर, सुचिता गावकर, दीपक गांवकर कार्तिकी गांवकर, प्रतीक्षा गांवकर उपस्थित होते
कार्यक्रमाला मुंबई स्थित व स्थानिक गावकर कुटुंबीयांचे बहुमोल सहकार्य लाभले (पोषण अभियान अंतर्गत ३ सप्टेंबर रोजी रोजी अंगणवाडी गांवकरवाडी येथे देवणेवाडी अंगणवाडी व गावकरवाडी अंगणवाडी यांचा संयुक्त पोषण अभियान कार्यक्रम घेण्यात आला होता) गणपती बाप्पा मोरया, गौरी मातेच्या जयघोषात गौरी विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला व कार्यक्रमाची सांगता झाली.