पत्रकार उमेश परब यांचे बंधू होत.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या हळवल परबवाडी येथिल दशरथ बाळकृष्ण परब (वय – ३३ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी आज १२ सप्टेंबर रोजी दुपारी निधन झाले. अत्यंत मनमिळाऊ व्यक्ती म्हणून ते ओळखले जात होते.
त्यांच्या पश्चात, आई, भाऊ, बहिणी, काका, काकी, वहिनी, पुतणे, पुतण्या, भावोजी, भाचे, भाची असा परिवार आहे. पत्रकार उमेश परब यांचे ते सख्खे भाऊ होत.