रात्री उशिरा झालेल्या घटनेचा आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलने केला होता ताबडतोब पाठपुरावा ; पळसंब वासियांनी आंदोलन केले स्थगित.
माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर व सरपंच महेश वरक यांनी शेतकर्याच्या न्यायाचा मुद्दा उचलून धरत घटनेच्या गांभिर्याची घेतली होती दखल.
मालवण | प्रतिनिधी : काल रात्री पळसंब येथे ‘गोवा २’ प्रकल्पासमोर रात्री १०;३० च्या दरम्यान चिर्याने ओव्हरलोड भरलेल्या १६ चाकी ट्रक एका शेतात पलटल्याच्या गंभीर घटने नंतर नुकसान ग्रस्त व गरीब शेतकरी श्री .दिपक आपकर यांना दगड वाहतूक करणाऱ्या गाडी मालकाकडून शेतीची व संरक्षक भिंतीची नुकसान भरपाई मिळायची मागणी केली गेली होती. अन्यथा पळसंब सरपंच महेश वरक, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर व पळसंब ग्रामस्थ यांनी रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.
त्यानंतर आज १२ सप्टेंबर रोजी दुपारी ट्रक मालकांनी शेतीची संरक्षण भिंत बाधून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर पळसंब ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलने मध्यरात्री उशिरा या घटनेची दखल घेत याचा व्हिडिओ न्यूज द्वारा पाठपुरावा केला होता.
या प्रसंगी पोलिस प्रशासन, महसूल विभाग यांचे तसेच ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले. त्यांचे पळसंब गावाच्या वतीने व दीपक आपकर यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात येत आहेत. त्यावेळी पळसंब सरपंच महेश वरक, माजी सरपंच श्री.चंद्रकांत गोलतकर, राजू चव्हाण, प्रमोद सावंत, पोलिस पाटिल सौ. पूनम गोलतकर ग्रामपंचायत सदस्य अक्षय परब, स्मिता जुवेकर, रुपाली सावंत, अनिकेत परब, सोमा सावंत, रमेश मुणगेकर, लगतचे खाण मालक दुलाजी कर्पे, गायतोंडे, पपू तुळपुळे, शेखर कांबळी, सुंदर भगत, अनिल भगत, बाबु हडकर यांनी उपस्थित राहत सहकार्य केले.