आयफोनच्या नव्या सीरिजच्या प्रतीक्षेत अनेक नागरिक होते. त्यांची ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. अॅपल ग्लोटाइम २०२४ इव्हेंटदरम्यान अखेर iPhone 16 सीरिज लॉंच करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये कंपनीने iPhone 16, iPhone 16 Pro, iPhone 16 plus, iPhone 16 Pro MAX मॉडेलसह चार नवीन iPhone मॉडेल्स लॉंच केले आहेत. भारतात iPhone च्या मॉडेल्सची किंमत किती असेल, हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. चला तर मग जाणून घेऊयात, काय आहेत किमती.
या फोनमध्ये अत्याधुनिक उपकरणे, हार्डवेअर आधारित कॅमेरा कंट्रोल बटण देण्यात आले असून यामुळे वापर करणाऱ्यांच्या फोटोग्राफीचा अनुभव भन्नाट होणार आहे. याशिवाय ए १८ आणि ए १८ प्रोसह जबरदस्त परफॉर्मन्स अपग्रेड्सदेखील देण्यात आले आहेत. ॲपल इंटेलिजेंस आधारित फीचर्समुळे आयफोन वापरण्याचा अनुभव पूर्ण बदलणार आहे.
आयफोन १६ आणि १६ प्लसची वैशिष्ट्ये
ॲपलचा आयफोन १६ हा एरोस्पेस ग्रेड ॲल्युमिनियम डिझाइनसह बाजारात आणण्यात आला आहे. हा फोन पाच नव्या रंगांत उपलब्ध होणार आहे. या फोनला काचेच्या सिरेमिक शील्डसह मजबूत संरक्षण देण्यात आले आहे. आयफोन १६ मध्ये ६.१ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, तर आयफोन १६ प्लसमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय नवीन डिव्हाईसमध्ये ॲक्शन बटण आणि हार्डवेअर आधारित कॅमेरा कंट्रोल्सदेखील देण्यात आले आहेत. ॲपलच्या इन-हाउस ६ कोर सीपीयू आणि ५ कोर जीपीयूसह ३ एनएम ए १८ चिप्ससह, त्यांना विशेष ॲपल इंटेलिजेंस फीचरदेखील देण्यात आले आहेत, यामुळे गेमिंगसाठी व चांगल्या प्रकारच्या फोटो व्हिडीओसाठी याचा फायदा होणार आहे.
कॅमेरा फिचर
नवीन कॅमेरा कंट्रोल बटणामुळे वापरकर्त्यांना फोटो क्लिक करणे सोपे झाले आहे. हे बटण दाबल्यास कॅमेरा उघडतो. तसेच दीर्घ टॅपिंग केल्यावर थेट व्हिडीओदेखील रेकॉर्ड केला जाऊ शकतो. या फीचरमध्ये झूमसारखे पर्यायदेखील देण्यात आले आहेत व कॅमेरा नियंत्रणदेखील यात केले जाऊ शकते. वापरकर्त्यांना या बटणासह लाईट प्रेस आणि क्लिक दोन्ही पर्याय मिळणार आहेत. या फोनमध्ये ४८ मेगा पीक्सलसह मुख्य कॅमेरा आणि १२ मेगा पीक्सलसह अल्ट्रा-वाइड लेन्ससह ड्युअल ४८ मेगा पीक्सल फ्यूजन कॅमेरा सेटअप या उपकरणांचा समावेश आहे. मुख्य लेन्सचा वापर २x टेलिफोटो कॅमेरा आणि मॅक्रो लेन्स म्हणूनदेखील केला जाऊ शकतो. यात १२ मेगा पीक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.