१० सप्टेंबरपर्यंत पर्यंत नांव नोंदणीची मुदत.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘मालवण तालुका पत्रकार समिती’ यांच्या वतीने मालवण तालुका पत्रकार समिती सदस्यांसाठी घरगुती गणपती बाप्पा सजावट स्पर्धा गणेशोत्सव कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. पारंपरीक व इकोफ्रेंडली सजावट यांना या स्पर्धेत प्राधान्य राहणार आहे.
सहभागी स्पर्धकांमधून विजेता स्वरूपात तिघांची निवड करण्यात येणार आहे. विजेत्यांना रोख स्वरूपात पारितोषिक प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. स्पर्धा प्रमुख म्हणून अमित खोत, दत्तप्रसाद पेडणेकर यांच्याकडे जबाबदारी असणार आहे, अशी माहिती पत्रकार समिती अध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली.
मालवण तालुका पत्रकार समिती कार्यकारणी बैठकित या वर्षीही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय झाला. या बैठकीत घरगुती गणेश मूर्ती व सजावट स्पर्धा मालवण तालूका पत्रकार समिती सदस्यांसाठी निश्चित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी पारितोषिके अध्यक्ष संतोष गावडे, अर्जुन बापार्डेकर, अमित खोत यांनी पुरस्कृत केली आहेत.
स्पर्धाकांनी आपली नाव नोंदणी मालवण तालुका पत्रकार समिती ग्रुपवर तसेच खजिनदार सिद्धेश आचरेकर यांच्याकडे १० सप्टेंबर पर्यंत नोंदवावीत.
तसेच गणपती मूर्ती व सजावट फोटो व व्हिडिओ यासह सजावट पारंपरिक पद्धत, इकोफ्रेंडली अश्या कोणत्या स्वरूपात केली त्याबाबत माहिती स्पर्धा प्रमुख अमित खोत, दत्तप्रसाद पेडणेकर यांच्या मोबाईल नंबरवर सर्व सहभागी स्पर्धाकांनी पाठवावी.
पत्रकार समिती पदाधिकारी, सदस्य हे स्पर्धकांच्या घरी जाऊनही परीक्षण करणार आहेत. तसेच स्पर्धा प्रमुख यांच्या परीक्षण नंतर सर्वानुमते तीन विजेते निश्चित केले जाणार आहेत. गेल्या वर्षी स्पर्धेस चांगला प्रतिसाद लाभला. या वर्षी जास्तीत जास्त समिती सदस्य यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे. असे आवाहन अध्यक्ष संतोष गावडे, सचिव सौगंध बादेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.