सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर धुरी यांनी केले रस्त्यावर ठींया आंदोलन
बांदा : राकेश परब
बांदा निमजगावाडी कडे जाणा-या रस्त्याला लागून असलेल्या नाल्यांमध्ये येथील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकरयानी आज स्वतः चक्क नाल्यात उतरून साफसफाई केली. त्यांच्या सोबत आंदोलन करणारे शामसुंदर धुरी होते. नाल्यात साचून राहिलेला कचरा काढून गेले काही दिवस तुंबणारा नाला प्रवाहित केला. या विरोधात तेथील सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर धुरी यांनी आक्रमक भूमिकाघेत रस्त्यावर ठीय्या मांडला होता. त्यामुळे वाहतूक काहीकाळ खोळंबली होती.याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांनी साफसफाई करण्याचा निर्णय घेतला.नाल्यांची साफसफाई वेळेत न झाल्यामुळे, पावसाचे पाणीतुंबल्यामुळे बांदा वाफोली रस्तावर पाणी येवून वाहतूक बंदराहते, त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत त्याठिकाणी ग्रामपंचायत सदस्य येऊन तोडगा काढत नाहीतोपर्यत माघार घेणार नाही, अशी भूमिका धुरी यांनी घेतली.यावेळी त्याठिकाणी ग्रामपंचायत सदस्य बांदेकर व रत्नाकरआगलावे यांनी धाव घेवून स्वतःहून साफसफाई केली.विशेष म्हणजे यावेळी शामसुंदर धुरी यांनी त्यांना मदत केली.