राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात आता राज्यस्तरावरील बड्या नेत्यांचे मालवण दौरे वाढले आहेत. दोन दिवसापुर्वी शिवसेना उबाठा पक्षाचे आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दौऱ्यानंतर आता शिवसेना नेते खासदार श्री.संजय राऊत हे मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणार आहेत. या निमित्ताने संजय राऊत आपल्या पक्षातील शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राणे विरुद्ध ठाकरे वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे.खासदार संजय राऊत यांचे शुक्रवारी ३० ऑगस्टला सकाळी १०.०० वा. चिपी विमानतळ येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी १०.३० वा.मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करतील. सकाळी ११.०० वा. समर्थ मंगल कार्यालय कोळंब मालवण येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करतील. त्यानंतर दुपारी २.०० वा. मालवण शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम शिवप्रेमी, शिवसेना, युवासेना, महिला, महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संदेश पारकर आणि संजय पडते शिवसेना जिल्हाप्रमुख सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -