25.7 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

खेमराज मेमोरियय इंग्लिश स्कुलच्या दहावीच्या १९९८-९९ बॅचचे रौप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन

- Advertisement -
- Advertisement -

बांदा : राकेश परब

खेमराज मेमोरियय इंग्लिश स्कुलच्या दहावीच्या १९९८-९९ बॅचचे रौप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमांनी व अनेक जुन्या आठवणीना उजाळा देत संपन्न झाले. यावेळी तब्बल २५ वर्षांनी शाळेचे सवंगडी एकत्र आलेत.

येथील हाय व्हॅली जंगल रिसॉर्ट मध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्याला दहावी बॅच मधील अ, ब, क, ड या वर्गातील ५० हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत बांदेकर यांनी केले. यावेळी बॅच मधील दिवंगत मित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली. वैभव मळेवाडकर यांनी स्नेहसंमेलनाचा उद्देश व या माध्यमातून भविष्यात होणारे विविध कार्यक्रम, समाजपयोगी उपक्रम याबाबत माहिती दिली. यावेळी अक्रम खान, वैभव मळेवाडकर, उदय येडवे, निलेश मोरजकर, अमित कल्याणकर, गजानन नाडकर्णी यांच्यासह सर्व मित्रांच्या उपस्थितीत केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रत्येकाने जुन्या आठवणीना उजाळा दिला. निलेश मोरजकर म्हणाले कि, रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे केल्यानंतर मे २०२५ मध्ये सर्व बॅचचा कौटुंबिक सोहळा परिवारासाह साजरा करण्यात येणार आहे. ऍड. परेश सावंत यांनी आपल्या बॅच मधील प्रत्येकाची खासियत आहे. नोकरी व्यवसायाबरोबरच अनेकांनी शेतीत देखील प्रगती साधली आहे. या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्र येत या बाबींना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे सांगितले. अक्रम खान यांनी केवळ कार्यक्रमासाठी एकत्र न येता सहकारी मित्रांच्या प्रत्येक सुख दुःखात देखील सहभागी होण्याचे आवाहन यावेळी केले. यावेळी सर्वांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व मित्रांचे यावेळी आभार मानण्यात आले. बॅच मधील काहीजण हे नोकरी व्यवसानिमित्त मुंबई, पुणे तसेच परदेशात असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. आभार उदय येडवे यांनी मानले. यावेळी अजय तोरसकर, मुकुंद येडवे, संदीप कदम, मोहसीन शेख, सिद्धार्थ माळकर, प्रसन्न कोचरेकर, संदेश कल्याणकर, वैभव गोरे, अनंत आईर, वैभव कुबडे, विष्णू वसकर, मोहसीन खतीब, प्रवीण मोटे, स्वप्नील पावसकर, सुधीर सावंत, प्रसाद सावळ, गणेश सावंत, सागर मांजरेकर, लकी बागवान, अमित सावंत, साबाजी धुरी, भाई म्हाडगुत, एकनाथ मावळणकर, प्रसाद शिरसाट, अभि साळगावकर, अल्ताफ खतीब, महेश खोबरेकर, अंकुश विरनोडकर आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!