27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आयुष्य आहे एक ‘गेट टू गेदर..!’ (मेघा आहेर..वाढदिवस विशेष)

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | वाढदिवस विशेष : जीवनाची वाट ज्याची त्याची असते. अगदी कितीही सोबत,साथ आणि आधार मानले तरीही ते कुठली ना कुठली गणिते सोडवायसाठीच मानलेली “क्ष” अक्षरे असतात. मग ते गणिताच्या समिकरणांना आपण नाते,संबंध, माया,आपुलकी, आदर,गरज, मित्रत्व किंवा शत्रुत्व वगैर अशा शाब्दिक तसब़िरीमध्ये बसवतो…..म्हणजे निदान बसवायचा प्रयत्न करतो. अखंड जीवन हे अशाच समीकरणांची एक मालिका म्हणले तर खरेच वावगं ठरणार नाही.
अशा जीवनमालिकांना एका माळेत अगदी मनोभावे आणून गुंफू पहाणारी काही माणसे असतात. खरेतर आपल्याला आपली समीकरणे सिद्ध करताना आणि गणितांच्या बेरजा वजाबाक्या शोधताना इतर जगाचा असून नसल्यासारखाच भास असतो तेंव्हा काही माणसे “आयुष्य आहे यार हे !चला…थोडे अनुभवुया..थोडे वाटुया, थोडे उधळुया आणि थोडे अंतर्मुख होत प्रसन्नताही मिळवुया “, अशा वृत्तीची खिदळण आणि उधळण करत जीवनात येतात. बरे ही माणसे माझी ,तुमची, ह्याची किंवा त्याची ह्या बॅनरखाली नसतात तर आबालवृद्ध प्रत्येकाच्याच निर्वात जीवन पोकळीतला एक भरगच्च मेघ बनून येतात.
अक्षरशः बरसतात…बरसायला शिकवतात आणि तरसलेल्या जीवन जाणिवांना स्वतः एका प्रसन्न ‘मेघाचा आहेर ‘ अगदी सात्विक आनंदाने भेट द्यायला शिकवतात. अत्यंत हुशार,व्यवहार कुशल आणि सालस प्रामाणिकपणा हा त्यांचा वैचारिक गाभा असतो. सामान्य सामाजिक जीवन जगता जगताही न कुरकुरता किती असामान्यपणे क्षणांना अनुभवता येते त्याचाच हा आहेर असतो….!
आहेर लग्नात, मुंजीत वगैरे देत असतीलही. …परंतु हा जीवनाच्या निर्वात पोकळीला मिळालेला आनंद मेघाचा आहेर हा खरेच एक खराखुरा “आनंदघन…!”
वरील सर्व गोष्टी ह्या नुसते एकट्या दुकट्या किंवा मित्र मैत्रिणींपुरत्याच वाटलेल्या नसतात तर हा मेघाचा आहेर करणारी माणसे ही प्रत्येक जीवाला एकमेकांशी जोडत जोडत हा मेघ विस्तारत असतात.
वय,जात,लिंग किंवा कुठलाच भेदाभेद त्यांच्या गावीही नसतो कारण समर्थांच्या जीवन जाणिवेची खुली बैठक हेच त्यांचे अधिष्ठान असते.
अशी माणसे कुठलाच आनंद एकट्याने साजरा करु शकत नाहीत…ही माणसे कधीच कोणाला एकटे पाडू देत नाहीत….ही माणसे सोबत असली काय,बोलली काय किंवा कधीच न भेटता बोलताही निव्वळ त्यांच्या चमकदार घनाने एखादे काळवंडलेले जीवनही नक्कीच चमकवून जातात…अगदी विनाशर्त. …विना अपेक्षा.
मुद्दा पुन्हा तिथेच येऊन अडतो…! जर सगळेजण कुठल्या ना कुठल्या गणिताला सोडवू पहातायत किंवा समिकरणाला सिद्ध करु पहातायत तर अशी मेघाचा आहेर घेऊन भेट देत जगणारी माणसे त्यांची समीकरणे व गणिते सोडवतात की नाही…आणि जर सोडवतात तर कशी….?
उत्तर येते….,” अशी माणसे परीक्षा देण्याघेण्यात व गुणांत स्वतःला अडकवत नाहीत व दुसर्यालाही पारख़त नाहीत.
अशी माणसे खूप वरच्या इयत्तेत असतात…अगदी वरच्या…!”
चाणाक्ष बुद्धी,भेदक नजर आणि पालकांचा आदर अशा त्रिसुत्रीवर जीवन जगत जगत अख्ख्या जगाला “आयुष्यावर बोलतं करु पहाणारी माणसे. ….हीच मेघा आहेर असतात..!” अशा माणसांना अमुक एका पत्त्यावर शोधता येथही परंतु त्याहीपेक्षा त्यांच्या भावना जाणल्या की त्या चराचरात पहातायत येतात. खंबीर मदत,संवेदना किंवा प्रसन्नता दिसली की समजावे तिथे नक्कीच ‘ मेघा आहेर ‘ नांदतेय. नांव वेगळे असेल….चेहरा वेगळा असेल परंतु ते तत्व मेघा आहेर असेलच. मेघा आहेर हा एक स्वयंपूर्ण माणुस सोहळा असतो…!
मेघाजी नेहमीच जीवन हे सुखदुःखांचे एक गेट टू गेदर आहे आणि तो तोंड पाडून जगले तर विखुरण्याची शक्यता जास्त असते ही समाज जाणिव सामाजिक मंचाद्वारे जगाला देऊ पाहतात.
समाजजाणिवा जपणारा त्या एक आत्मनिर्भर एन.जी.ओ. आहेत म्हणले तरी चालेल.
मेघा आहेर या स्फूर्तिदायक व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. अनेक जीवांना एकत्र आणून एकात्म स्पंदन देऊ पाहणारा त्यांचा निरामय श्वास हा नेहमीच निरामय राहो याच सदिच्छा.

सुयोग पंडित.( संस्थापक आणि मुख्य संपादक ,आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | वाढदिवस विशेष : जीवनाची वाट ज्याची त्याची असते. अगदी कितीही सोबत,साथ आणि आधार मानले तरीही ते कुठली ना कुठली गणिते सोडवायसाठीच मानलेली "क्ष" अक्षरे असतात. मग ते गणिताच्या समिकरणांना आपण नाते,संबंध, माया,आपुलकी, आदर,गरज, मित्रत्व किंवा शत्रुत्व वगैर अशा शाब्दिक तसब़िरीमध्ये बसवतो.....म्हणजे निदान बसवायचा प्रयत्न करतो. अखंड जीवन हे अशाच समीकरणांची एक मालिका म्हणले तर खरेच वावगं ठरणार नाही.
अशा जीवनमालिकांना एका माळेत अगदी मनोभावे आणून गुंफू पहाणारी काही माणसे असतात. खरेतर आपल्याला आपली समीकरणे सिद्ध करताना आणि गणितांच्या बेरजा वजाबाक्या शोधताना इतर जगाचा असून नसल्यासारखाच भास असतो तेंव्हा काही माणसे "आयुष्य आहे यार हे !चला...थोडे अनुभवुया..थोडे वाटुया, थोडे उधळुया आणि थोडे अंतर्मुख होत प्रसन्नताही मिळवुया ", अशा वृत्तीची खिदळण आणि उधळण करत जीवनात येतात. बरे ही माणसे माझी ,तुमची, ह्याची किंवा त्याची ह्या बॅनरखाली नसतात तर आबालवृद्ध प्रत्येकाच्याच निर्वात जीवन पोकळीतला एक भरगच्च मेघ बनून येतात.
अक्षरशः बरसतात...बरसायला शिकवतात आणि तरसलेल्या जीवन जाणिवांना स्वतः एका प्रसन्न 'मेघाचा आहेर ' अगदी सात्विक आनंदाने भेट द्यायला शिकवतात. अत्यंत हुशार,व्यवहार कुशल आणि सालस प्रामाणिकपणा हा त्यांचा वैचारिक गाभा असतो. सामान्य सामाजिक जीवन जगता जगताही न कुरकुरता किती असामान्यपणे क्षणांना अनुभवता येते त्याचाच हा आहेर असतो....!
आहेर लग्नात, मुंजीत वगैरे देत असतीलही. ...परंतु हा जीवनाच्या निर्वात पोकळीला मिळालेला आनंद मेघाचा आहेर हा खरेच एक खराखुरा "आनंदघन...!"
वरील सर्व गोष्टी ह्या नुसते एकट्या दुकट्या किंवा मित्र मैत्रिणींपुरत्याच वाटलेल्या नसतात तर हा मेघाचा आहेर करणारी माणसे ही प्रत्येक जीवाला एकमेकांशी जोडत जोडत हा मेघ विस्तारत असतात.
वय,जात,लिंग किंवा कुठलाच भेदाभेद त्यांच्या गावीही नसतो कारण समर्थांच्या जीवन जाणिवेची खुली बैठक हेच त्यांचे अधिष्ठान असते.
अशी माणसे कुठलाच आनंद एकट्याने साजरा करु शकत नाहीत...ही माणसे कधीच कोणाला एकटे पाडू देत नाहीत....ही माणसे सोबत असली काय,बोलली काय किंवा कधीच न भेटता बोलताही निव्वळ त्यांच्या चमकदार घनाने एखादे काळवंडलेले जीवनही नक्कीच चमकवून जातात...अगदी विनाशर्त. ...विना अपेक्षा.
मुद्दा पुन्हा तिथेच येऊन अडतो...! जर सगळेजण कुठल्या ना कुठल्या गणिताला सोडवू पहातायत किंवा समिकरणाला सिद्ध करु पहातायत तर अशी मेघाचा आहेर घेऊन भेट देत जगणारी माणसे त्यांची समीकरणे व गणिते सोडवतात की नाही...आणि जर सोडवतात तर कशी....?
उत्तर येते....," अशी माणसे परीक्षा देण्याघेण्यात व गुणांत स्वतःला अडकवत नाहीत व दुसर्यालाही पारख़त नाहीत.
अशी माणसे खूप वरच्या इयत्तेत असतात...अगदी वरच्या...!"
चाणाक्ष बुद्धी,भेदक नजर आणि पालकांचा आदर अशा त्रिसुत्रीवर जीवन जगत जगत अख्ख्या जगाला "आयुष्यावर बोलतं करु पहाणारी माणसे. ....हीच मेघा आहेर असतात..!" अशा माणसांना अमुक एका पत्त्यावर शोधता येथही परंतु त्याहीपेक्षा त्यांच्या भावना जाणल्या की त्या चराचरात पहातायत येतात. खंबीर मदत,संवेदना किंवा प्रसन्नता दिसली की समजावे तिथे नक्कीच ' मेघा आहेर ' नांदतेय. नांव वेगळे असेल....चेहरा वेगळा असेल परंतु ते तत्व मेघा आहेर असेलच. मेघा आहेर हा एक स्वयंपूर्ण माणुस सोहळा असतो...!
मेघाजी नेहमीच जीवन हे सुखदुःखांचे एक गेट टू गेदर आहे आणि तो तोंड पाडून जगले तर विखुरण्याची शक्यता जास्त असते ही समाज जाणिव सामाजिक मंचाद्वारे जगाला देऊ पाहतात.
समाजजाणिवा जपणारा त्या एक आत्मनिर्भर एन.जी.ओ. आहेत म्हणले तरी चालेल.
मेघा आहेर या स्फूर्तिदायक व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. अनेक जीवांना एकत्र आणून एकात्म स्पंदन देऊ पाहणारा त्यांचा निरामय श्वास हा नेहमीच निरामय राहो याच सदिच्छा.

सुयोग पंडित.( संस्थापक आणि मुख्य संपादक ,आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)

error: Content is protected !!