25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

‘लाडका शेतकरी योजना’ राबवण्यात येणार असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा..!

- Advertisement -
- Advertisement -

ब्यूरो न्यूज : ‘लाडकी बहीण व लाडका भाऊ’ योजनांनंतर आता ‘लाडका शेतकरी योजना’ राबवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीयं. बीडमधील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करुन देणे हे महायुती सरकारचे काम आहे. आम्ही पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचे काम करीत आहोत. आमच्या सरकारचे धोरण कष्टकरी, वारकरी, शेतकरी सुखी हेच आहे. त्यामुळे आता आम्ही ‘लाडका शेतकरी योजना’ राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली. त्यानंतर लाडका भाऊ योजना आणली. आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार आहोत. सर्व भाऊ लाडके झाले, सर्व बहीणी लाडक्या झाल्या, आता शेतकरीही लाडका होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु करण्यात येत आहे. विविध नेत्यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. अशातच मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरु केलीयं. या योजनेची चर्चा सुरु असतानाच आता लाडकी शेतकरी योजनेची घोषणा करण्यात आली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ब्यूरो न्यूज : 'लाडकी बहीण व लाडका भाऊ' योजनांनंतर आता 'लाडका शेतकरी योजना' राबवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीयं. बीडमधील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करुन देणे हे महायुती सरकारचे काम आहे. आम्ही पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचे काम करीत आहोत. आमच्या सरकारचे धोरण कष्टकरी, वारकरी, शेतकरी सुखी हेच आहे. त्यामुळे आता आम्ही 'लाडका शेतकरी योजना' राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली. त्यानंतर लाडका भाऊ योजना आणली. आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार आहोत. सर्व भाऊ लाडके झाले, सर्व बहीणी लाडक्या झाल्या, आता शेतकरीही लाडका होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु करण्यात येत आहे. विविध नेत्यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. अशातच मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरु केलीयं. या योजनेची चर्चा सुरु असतानाच आता लाडकी शेतकरी योजनेची घोषणा करण्यात आली.

error: Content is protected !!