सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे आणि युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले यांच्या सहकार्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.
सिंधुदुर्ग | ब्युरो न्यूज : नुकताच जगात व देशात भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना सिंधू रनर्स टीम कडून ‘सावंतवाडी १२ तास रन’ या उपक्रमाच्या रूपाने अनोखी मानवंदना देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्यातील होतकरू आणि क्रीडा प्रेमी तरुणांना स्वतःचे कौशल्य दाखवण्यासाठी आणि राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर पोहचलेल्या खेळाडूंकडून अधिकाधिक ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी स्वतःचे व्यासपीठ मिळावे म्हणून सिंधू रनर्सटीम ने सावंतवाडी येथे ३ तास / ६ तास आणि १२ तास रनची संकल्पना राबवली. सिंधुदुर्ग जिल्यात एवढी दीर्घ रन आयोजीन करण्याची ही चौथी वेळ होती. सिंधू रनर्स चे टीम मेंबर्स ओंकार पराडकर, डॉ. स्नेहल गोवेकर, प्रसाद कोरगांवकर, डॉ. प्रशांत माधव, भूषण बान्देलकर आणि इतर टीम जवळपास २ ते ३ महिने हा इव्हेंट नीट पार पडावा म्हणून लागणाऱ्या परवानग्या घेणे, टी-शर्ट, सन्मानचिन्ह, हायड्रेशन सपोर्ट अश्या बऱ्याच गोष्टीची जुळवाजुळव करत होते. बाहेर गावाहून येणाऱ्या आपल्या रनरमित्रांची नीट व्यवस्था आणि योग्य पाहुणचार व्हावा यासाठी सिंधू रनर टीमने विशेष खबरदारी घेतली.
या रन मध्ये जिल्यातील आणि जिल्ह्याबाहेरील तब्बल ६० धावकांनी सहभाग नोंदविला. या अभिनव उपक्रमाला सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे आणि युवाराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले यांचा महत्वपूर्ण पाठिंबा लाभला. ही रन १७ ऑगस्ट २०२४ संध्याकाळी ८ वाजता सावंतवाडीच्या ऐतिहासिक वारसा असलेल्या राजवाडा येथून सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे आणि भारताचे प्रख्यात जलतरणपटू, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि टॅन झिंग नॉर्वे पुरस्कार विजेते श्री रोहन मोरे यांच्या आणि इतर मान्यवारांच्या उपस्थितीत १७ ऑगस्टला रोजी संध्याकाळी ८ वाजता सुरु झाली. राजवाड्यातून सुरवात होऊन पुढे सावंतवाडी मोती तलावाला १.६ किलोमीटर अंतर धावकांना ३ तास / ६ तास आणि १२ तास रन करायचे होते. किती किलोमीटर पाळायचे हे बंधन नव्हते पण धावकांनी त्यांनी निवडलेले रन टाईमिंग पूर्ण करणे बंधनकारक होते. सर्व रनर च्या एक मताने हायड्रेशन आणि फूड आयोजन केले होते. रात्रभर रन असल्याने धावकांची खरी कसोटी झोपेच्या वेळेस पळणे ही होती. सिंधू रनर टीमच्या मदतीला भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडीचे तज्ज्ञ डॉक्टर्स ची टीम आणि फिसिओ सपोर्टला ब्यारिस्टर नाथ पै फिजीओथेरपी कॉलेज ची टीम पण होती. या टीमने वेळोवेळी रनर ला मेडिकल चेकअप आणि फिजीओथेरपि सपोर्ट देऊन पुढील रन करण्यास मोलाचा हातभार लावला.
सिंधुदुर्ग जिल्यातील काही नावाजलेल्या डॉक्टर्सनी रन मध्ये सहभाग नोंदविला व सिंधू रनर च्या आयोजनाबद्दल भरभरून शुभेच्या दिल्या. याच दरम्यान काही छोट्या धावकांनी पण २ ते ३ तासांची रन सहज बुरड, ओम राऊत आणि मानस सावंत या छोट्या धावकांनी सगळ्या रनर ची मनेजिंकली. या छोट्या धावकांना पाहुण्यांच्या हस्ते गोल्ड मेडल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. जशी वेळ संपत जात होती तशी धावकांची दमछाक पण होत होती पण जास्तीत जास्त किलोमीटर पूर्ण करणार या ध्येयाने झपाटलेले धावक सतत पळत होते. १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ठीक ८ वाजता राजवाड्यात रनची सांगता करण्यात आली. रन पूर्ण झाल्यावर धावकांना फयसीओ थेरपी देण्यात आली आणि अल्पोपहार देण्यात आला.
या इव्हेंटचा मानचिन्ह प्रदान सोहळा राजवाडा येथे सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे, भारताचे प्रख्यात जलतरणपटू, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि टॅन झिंग नॉर्वे पुरस्कार विजेते श्री रोहन मोरे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती विद्या शिरस या मान्यवारांच्या उपस्थित पार पडला. प्रत्येक धवकाला सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी उपस्थित मान्यवारांनी या अभिनव उपक्रमामुळे आपल्या जिल्ह्याला आणि देशाला जागतिक पातळीवर नेणारे धावक तयार होतील अशी अशा व्यक्त केली आणि सिंधू रनर टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.
या रन मध्ये प्रत्येक रन प्रकारात विजेत्या व उपविजेत्या धवकाला विशेष संपाम चिन्ह देण्यात आले. ३ तास रन मध्ये गजानन भाताडे, प्रेरणा लोहार प्रथम क्रमांक आणि रमेश पाटील, कृतिका लोहार यांनी दुतीय क्रमांक प्राप्त केला, ६ तास रन मध्ये सुनील जडेजा, श्वेता गावडे प्रथम क्रमांक आणि नर्सिव्ह नागवेंकर, डॉ. अनघा बोर्डवेकर यांनी दुतीय क्रमांक प्राप्त केला आणि १२ तास रन मध्ये नितीन फेडते, नम्रता कोकरे प्रथम क्रमांक आणि निखिल तेंडोलकर, अमृता पानसे यांनी दुतीय क्रमांक प्राप्त केला. नम्रता कोकरे हिने जिल्ह्यातून १२ तास रन करणाऱ्या पहिल्या महिला होण्याचा मान पटकावला.
यातील धावकांची नावे आणि किलोमीटर्स खालील प्रमाणे.
३ तास रन : हरीश नार्वेकर, रमेश पाटील, प्रेरणा लोहार, गिरीश आमडोसकर, मंगेश पिंगुळकर, वसंत कार्लेकर, गौरेश गवस, रित्विक जाधव, रुपेश जाधव, समीक्षा बान्देलकर, गजानन भाताडे, सुजित कुमार जाधोर, प्रीती सामंत, बाळकृष्ण खानोलकर, ऋषिकेश लवाटे, कृतिका लोहार, डॉ रवी गोलघाटे, शिवानी तळेकर, उमेश मोरे, सचिन पुराणिक, उदय पाटील, सहज बुरड, ओम राऊत आणि मानस सावंत.
६ तास रन: डॉ प्रशांत मडव, डॉ प्रशांत सामंत, डॉ उमेश सावंत, महेश शेटकर, रोहित कोरगावकर, श्वेता गावडे, मेघराज कोकरे, जागृती बान्देलकर, रमेश सावंत, सुनील जडेजा, सगुण गावडे, नरसिंह नागवेनकर, फ्रांकी गोम्स, सुरेश शिरोडकर, प्रसाद बांदेकर, प्रशांत माळकर अजित पाटील, डॉ गिरीश बोर्डवेकर, डॉ अनघा बोर्डवेकर, डॉ मिलिंद बोर्डवेकर, डॉ सोमनाथ परब आणि प्रथमेश कदम.
१२ तास रन: प्रज्योत राणे, अमृता पानसे, निखिल तेंडोलकर, नम्रता कोकरे, विनायक पाटील, भूषण पराडकर, नितीन फडते, अद्वैत प्रभुदेसाई, राजेंद्र शेळके आणि डॉ स्नेहल गोवेकर.
या उपक्रमात केलेल्या सकार्याबद्दल सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे आणि युवाराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसल यांच्यासह भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडी, फिसिओ सपोर्टला ब्यारिस्टर नाथापै फिजीओथेरपि कॉलेज कुडाळ, सागर साळुंखे (मुख्याधिकारी सावंतवाडी नगरपरिषद), देवयानी वारस्कार कोकण साद लाईव्ह आणि दैनिक कोकण सादचे मुख्य संपादक, करण पांचाळ आणि टीम फोटोशूट, सदा स्पोर्ट्स (सदानंद धुरी), सिंधुदुर्ग जिल्हा मेडिकल अससोसिएशन, अर्पण मेडिकल (रामा गावडे, मयूर T -शिर्ट्स (मालवण कट्टा), टीम Runbuddies (Bib ट्रॅकिंग सिस्टिम), आपली सिंधुनगरी न्युजचे मुख्य संपादक सुयोग पंडित (मालवण), रवींद्र Decoration, आशिष प्रिंट्स कुडाळ, भवानी प्रिंट्स सावंतवाडी यांचे सिंधू रनर्सच्या वतीने काॅम्रेड मॅरॅथाॅनचे हिरो श्री ओंकार पराडकर व सहकारी यांनी आभार मानले आहेत.
धावणे या व्ययाम प्रकारा बद्दल जनसामान्यात जागृती करून आपल्या जिल्यात व राज्यात देशाचे नेतृत्व करणारे धावपटू तयार करणे हेच या मागचे उद्धिष्ट आहे. सिंधू रनर टीम ने आता पर्यंत सावंतवाडी १२ तास रन ३ वेळेस, गोवा ते सावंतवाडी १०० किलोमीटर रन २ वेळेस, मालवण ते सावंतवाडी आरमार रन ३ वेळेस, २४ तास स्टेडियम रन, हिमालयन खारडुंगला अल्ट्रा रन ७२ किलोमीटर, देहू ते पंढरपूर २६६ किलोमीटर, टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, पुणे अल्ट्रा मॅरेथॉन, जम्पिंग गोरिला ट्रेल रन, लोकमत मॅरेथॉन, ठाणे हाफ मॅरेथॉन, टाटा मुंबई मॅरेथॉन, वसई विरार मॅरेथॉन, अदानी अहेमदाबाद मॅरेथॉन, गोवा रिव्हर मॅरेथॉन अश्या आणि अनेक रन मध्ये भाग घेऊन आपल्या जिल्याह्याचे नाव जगभरात गाजवले आहे. साऊथ आफ्रिका येथे झालेल्या जगप्रसिद्ध कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये यावर्षी सिंधू रनर टीमच्या प्रसाद कोरगावकर आणि ओंकार पराडकर या दोन धावपटूंनी देशाचे प्रतिनिधित्व करून जिल्ह्याचे आणि देशाचे नाव जगभरात पोचवले आह.